Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमवाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीसह १० लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; नगर एलसीबीची...

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीसह १० लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; नगर एलसीबीची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
पारनेर :
तालुक्यातील पोखरी येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा आरोपीसह १० लाख ३० हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे. कृष्णा गिताराम सोनवणे (वय ३१, रा. वासूंदे, ता. पारनेर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोकाॅ रणजीत जाधव व शिवाजी ढाकणे यांनी ही कारवाई केली आहे.

समजलेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ने दि.२ एप्रिल २०२४ रोजी पारनेर पोलिस ठाण्याचे अंमलदारांना सोबत घेऊन पोखरी गावात वारणवाडी फाटा (ता. पारनेर) येथे सापळा लावून थांबलेले असताना थोडाच वेळात माहितीप्रमाणे एक पांढरे रंगाचा ढंपर येताना दिसला. एलसीबी टिम’ला खात्री होताच ढंपर चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करताच चालकाने ढंपर रस्त्याचे कडेला थांबविला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून ढंपरची पाहाणी करता ढंपरमध्ये शासकीय वाळू असल्याची खात्री झाल्याने चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कृष्णा गिताराम सोनवणे (वय ३१, रा. वासूंदे, ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. त्यास शासकीय वाळू वाहतूकीचा परवानाबाबत विचारपुस करता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकीची वाळू अवैधरित्या चोरी करुन वाहतूक केल्याने १० लाख रुपये किंमतीचा १ पांढरे रंगाचा ढंपर व ३० हजार रुपये किंमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण १० लाख ३० हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४१/२०२४ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments