Monday, May 20, 2024
Homeक्राईमनागरदेवळेच्या युवकावर हल्ला करणा-यांना पकडले; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

नागरदेवळेच्या युवकावर हल्ला करणा-यांना पकडले; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणा-या ६ जण‌ पकडले; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यानगर
: नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणा-या सहाजणांना नगर एलसीबी टिम’ने ताब्यात घेतले आहेत.
सोहेल चाँद शेख (वय २६, रा. बुऱ्हानगर रोड, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), शोएब चाँद शेख (वय २६), शोएब हमीद सय्यद (वय २३, रा. गोटीची तालीमजवळ, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), अमीन हुसेन पठाण (वय २१), साहील अकबर पठाण (वय २८ रा. मराठी शाळेमागे, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण (वय ३०, रा. विठ्ठल रुख्मीनी मंदीराजवळ, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, संतोष लोढे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, सचिन अडबल अरुण मोरे आदिंच्या टिमने ही कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रादार पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हे नागरदेवळे गावातून त्यांच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असतांना सोहेल चाँद शेख (रा. नागरदेवळे) व त्याच्या इतर ७ साथीदारांनी तक्रारदार यास तलवार, लाकडी दांडके, लोखंडी गजाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र यास सुध्दा शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७२/२०२४ भादवि कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ आर्म ॲक्ट कायदा कलम ४/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने एसपी राकेश ओला यांनी एसपी दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि एसपी दिनेश आहेर यांनी एलसीबीच्या दोन टिम तयार करुन आरोपीची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
एलसीबी टिम’ने गुन्हा ठिकाणी भेट देवुन गुन्ह्याचे पार्श्वभुमीची माहिती घेतली. गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपीविषयी काहीएक माहिती मिळून येत नव्हती. वरील दोन्ही पोलीसांच्या टिमने मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असतांना दि.७ में २०२४ रोजी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. पोनि श्री आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेणेबाबत सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबी टिम’ने त्या ठिकाणी जाऊन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये सहाजण बसलेले दिसले. त्या सहाजणांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे सांगितली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस हे करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments