Sunday, May 19, 2024
Homeक्राईमशेवगावाला ८ लाखांचा गांजा जप्त ; शेवगाव पोलिसांची कारवाई

शेवगावाला ८ लाखांचा गांजा जप्त ; शेवगाव पोलिसांची कारवाई

शेवगावाला ८ लाखांचा गांजा जप्त ; शेवगाव पोलिसांची कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
शेवगाव :
तालुक्यातील मुंगी गावच्या शिवारातून ८ लाख ९६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा लाखो रुपयांच्या गांजा जप्त करुन एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुकुंद विनायक होळकर (रा.मुंगी ता. शेवगाव जि. अहमदनगर) ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि.दिगंबर भदाणे यांच्या सूचनेनुसार पोसई अमोल पवार, सफौ राजु ससाणे, पोहेकों नाकाडे, पोहेका किशोर काळे, पोना उमेश गायकवाड, पोना संदिप आव्हाड, पोकॉ शाम गुंजाळ, पोकाॅ बाप्पासाहेब धाकतोडे, पोकाॅ अमोल ढाळे, पोकाॅ एकनाथ गर्कळ, पोकाॅ संतोष वाघ, चापोहेकाॅ बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोम्बींग ऑपरेशन राबवून अंमली पदार्थ, अवैध धंदे, अग्निशस्त्रे व हत्यारे तपासणीबाबतच्या मोहिम राबविण्यात येत आहे. या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद विनायक होळकर (रा.मुंगी ता. शेवगाव जि. अहमदनगर) यास पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्यांच्याकडील गांजाच्या झाडाबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, झाडे ही माझे मालकीचे शेत गट नं.८५ मध्ये शेतात लागवड केलेली आहेत. तुम्ही माझ्यासोबत चला ते मी दाखवून देतो. तेव्हा पोलीस स्टाफ व शासकीय पंचासमक्ष आरोपीने त्याचे शेतातील गांजाची झाडे दाखविली तेव्हा पोलिसांची व पंचाची खात्री झाल्याने गांजाची झाडे ताब्यात घेतली‌. दोन पंचासमक्ष वजन करुन ताब्यात घेण्यात आली. गांजाची झाडे ९४ लहान मोठी हिरवी झाडे व तीन सुकलेली झाडे ५ हजार रुपये प्रति किलो. त्याचे एकूण वजन १७९ किलो २४ ग्रॅम असुन त्याची एकुण किंमत ८ लाख ९६ हजार २०० रुपये वजनाचे असे जागीच जप्त करुन ती शेवगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. आरोपीविरुध्द पोकॉ शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं.- ४०२/२०२४ एन डी पी एस कायदा सन-१९८५ चे कलम २० (ब) प्रमाने आरोपी मुकुंद विनायक होळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अमोल पवार हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments