Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedलोकसभा निवडणूक; पाथर्डी पोलिसांचे सशस्र पथसंचलन...!

लोकसभा निवडणूक; पाथर्डी पोलिसांचे सशस्र पथसंचलन…!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :-
होऊ घातलेली लोकसभा निवडणूक तथा यात्रा सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीसांच्या वतीने सीमा सुरक्षा बल जवानांसह शहरातून पोलिसांनी सशस्त्र पथ संचलन केले.
या पथसंचलनात बीएसएफचे असिस्टंट कंमाडिंग ऑफीसर अखिलेशकुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ३७ जवान व पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांच्यासह १९ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणूकीची धावपळ सुरू असून आगामी काळात मोठे उत्सव तसेच गावोगाव होणाऱ्या यात्रा होणार आहेत. याकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला कायम सतर्क राहावे लागणार आहे. त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे पोलीस जवान व पाथर्डी पोलीस यांनी पाथर्डी शहरातून सशस्त्र संचलन करत शक्तीप्रदर्शन केले
.


पाथर्डी शहर व तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून हे पथसंचलन करण्यात आले. कायदा सुव्यवस्था व्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज व सतर्क आहेत, हा संदेश या निमित्ताने समाजकंटकांना देण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला.. सीमा सुरक्षा दल पोलिसांचे विशेष पथक पाथर्डी शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील नगररोड, जुने बस स्थानक, नाईक चौक, नवीपेठ, , अजंठा चौक, मेनरोड या मार्गाने पोलिसांनी हे पथसंचलन केले. तसेच तालुक्यातील महत्वाची बाजरापेठ असलेले तिसगावआणि मढी या ठिकाणीही पथसंचलन करण्यात आले. कायदा जर कोणी मोडला,किंवा समाजाची, शांतता भंग होईल असे वर्तन करणाऱ्या अथवा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कठोरातील कठोर कारवाई करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करावे., सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पाथर्डी पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments