Thursday, May 9, 2024
Homeक्राईमविक्रीसाठी गांजा, हेरॉईन आणणा-यास नगर एलसीबी टिम'ने पकडले

विक्रीसाठी गांजा, हेरॉईन आणणा-यास नगर एलसीबी टिम’ने पकडले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
संगमनेर :
तालुक्यातील शिवाजीनगर येथे विक्रीसाठी गांजा, हेरॉईन आणणा-यास नगर एलसीबी टिम’ने पकडले आहे. अंबादास शांताराम शिंदे (रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व संगमनेर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सपोनि हेमंत थोरात व अंमलदार सचिन अडबल, संतोष खैरे, अमृत आढाव प्रमोद जाधव, व उमाकांत गावडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर (ता. संगमनेर) या ठिकाणी जाऊन संशयीत अंबादास शिंदे याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन त्याचे राहत्या घरासमोर जाऊन खात्री करता घरात एकजण पलंगावर बसलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अंबादास शांताराम शिंदे (रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्याची व घराची पंचा समक्ष झडती घेता संशयीत बसलेल्या पलंगाचे खाली पांढरे रंगाच्या गोणीत उग्रवास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळून आला. तसेच त्याचे पॅन्टचे खिशात प्लॅस्टीकचे पारदर्शक पिशवीत विटकरी रंगाची पावडर मिळून आली. पथकाने पलंगाची पाहणी करता पलंगामध्ये असलेल्या लोखंडी पत्र्याचे पेटीमध्ये भारतीय चलनातील विविध दराच्या नोटा मिळून आल्या. पथकाने पांढरे रंगाच्या गोणीत मिळून आलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला या बाबत विचारणा करता त्याने पांढ-या रंगाच्या गोणीत बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा व पारदर्शक पिशवीतील पावडर ही गर्द/हेरॉईन असुन विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने आरोपी अंबादास शांताराम शिंदे (वय ४३, रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, त. संगमनेर) याच्या घरात पांढ-या रंगाच्या गोणीत ठेवलेला ४५ हजार ३० रुपये किंमतीचा ४ किलो ४९८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा, ७२ हजार रुपये किंमतीचा गर्द/हेरॉईन व ४ लाख १५० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख १७ हजार १८० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो हस्तगत करुन आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.३२५/२०२४ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments