Saturday, May 18, 2024
Homeक्राईमराशिन, मिरजगांव परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना पकडले ; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

राशिन, मिरजगांव परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

राशिन, मिरजगांव परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
Nagar Reporter
Online news Natwork
कर्जत :
तालुक्यातील घरफोडीमध्ये रशिन परिसरात घडलेल्या घटनांमधील दोघांना तर मिरजगाव परिस्थिती घटनांमध्ये एका चोरट्यास पकडण्यात नगर एलसीबी टिम’ला यश आले आहे.

तालुक्यातील राशिन परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघा आरोपींना नगर एलसीबी टिम’ने जेरबंद केले आहे. अमोल हैवान काळे (वय ३०, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), पराग ऊर्फ गोट्या मुकूंद बेदरे (रा. आष्टी, जि. बीड) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि तुषार धाकराव व अंमलदार संतोष लोढे, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळु खेडकर, अमोल कोतकर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, रोहित येमुल, जालींदर माने, संभाजी कोतकर व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२५ 25 एप्रिल २०२४ रोजी फिर्यादी अविनाश बुवासाहेब कदम ( रा. राशिन, ता. कर्जत) हे घर बंद करुन गांवी गेले असताना अनोळखी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन कपाटातील १ लाख १८ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले, याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३०१/२०२४ भादविक ४५७,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा एलसीबी टिम’ने समांतर तपास सुरू केला असता, पोलिसांना दि.२ में २०२४ रोजी कर्जत परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. या दरम्यान एलसीबी टिम’ला दाखल गुन्हा आरोपी अमोल हैवान काळे (रा. आष्टी, जि. बीड) याने त्याचे साथीदारांसह केला आहे. तो कुळधरण फाटा (ता. कर्जत) येथे उभा आहे, आता गेल्यास मिळून येईल, अशी माहिती मिळाली. एलसीबी टिम’ने कुळधरण फाटा येथे जाऊन आरोपींचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार फरार असणारे सदा गोरख भोसले ( रा. हाजापुर शिवार, ता. आष्टी, जि. बीड), सुशील अशोक काळे (रा. भोंडगीर-पिंपरखेडा शिवार, ता. आष्टी, जि. बीड) अशा साथीदारांसह चोरी केली आहे. चोरीतील सोन्या चांदीचे दागिने हे साथीदार पराग ऊर्फ गोट्या मुकूंद बेदरे (रा. आष्टी, जि. बीड) यास दिल्याचे सांगितले. त्या आरोपीचा शोध घेता पराग ऊर्फ गोट्या मुकूंद बेदरे हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील दोघांनाही कर्जत पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३०१/२०२४ भादविक ४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहे.

मिरजगांव परिसरातील घरफोडी करणारा आरोपी अटक ; ‘नगर एलसीबी’ कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
कर्जत: तालुक्यातील मिरजगांव परिसरात घरफोडी करणारा आरोपी पकडण्यात नगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. सोमनाथ गणेश मिसाळ (वय ३१, रा. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि सोपान गोरे व अंमलदार विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, सागर ससाणे, अमृत आढाव, संतोष खैरे, विजय ठोंबरे व भरत बुधवंत आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२९ एप्रिल २०२४ रोजी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश व उचकापचक करुन घरातील ४ लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले, याबाबत नाना चंद्रभान पवार ( रा. नागलवाडी, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगांव पोलिस ठाण्यात गु.र.नं. १३३/२०२४ भादविक ४५४,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न व अटक करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे एसपी राकेश ओला यांनी एलसीबी विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एलसीबी विभागाने घरफोडीचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन तपास सुरू केला होता. एलसीबी टिम’ने व अंगुलीमुद्रा तज्ज्ञ अहमदनगर यांनी घटना ठिकाणीभेट देऊन घटना ठिकाणचे बारकाईने निरीक्षण केले. त्या ठिकाणी अंगुलीमुद्रा तज्ज्ञ यांना आरोपीचे ठसे आढळून आले होते. अंगुलीमुद्रा तज्ज्ञ यांनी आढळून आलेल्या बोटांचे ठशांचे विश्लेषण केले असता ठसे हे आरोपी सोमनाथ गणेश मिसाळ (रा. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने एलसीबी टिम’ने आरोपीचा शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासकामी मिरजगांव पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास मिरजगांव पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments