Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हामयत अण्णा गायकवाडच्या लेकरांना किराणा साहित्यरुपी मायेचा आधार

मयत अण्णा गायकवाडच्या लेकरांना किराणा साहित्यरुपी मायेचा आधार

मयत अण्णा गायकवाडच्या लेकरांना किराणा साहित्यरुपी मायेचा आधार
Nagar Reporter
Online news Natwork
शेवगाव :
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील शेतमजूर अण्णा गायकवाडचा पंधरा दिवसांपूर्वी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाला होता.त्याच्या पाठीमागे सहा महिन्यांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई वडिल असा परिवार असून घरातील कमवता व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या कुटुंबाला काहीतरी सहकार्य करावे असा विचार ‘दोस्ती ग्रुप’ या व्हाट्सअप समूहावर काही सदस्यांनी मांडला, बाकीच्यांनी प्रतिसाद देत आप आपल्या परिने आर्थिक मदत एकत्र करून किराणा साहित्य खरेदी केले व आज दिनांक 8 रोजी संबंधित कुटूंबाकडे सुपूर्द केले. यामध्ये कांबी गावचे सरपंच श्री नितीश पारनेरे,अजय गुंजाळ,विजय गुंजाळ, सतिष थोरे, मेजर गणेश मुरदारे, भगवान बाबा मल्टीस्टेट चे शेवगाव शाखा व्यवस्थापक संतोष वैद्य आदींनी आर्थिक सहकार्य केले आहे.प्रहार दिव्यांग आघाडी चे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण अभंग यांनी या कामी पुढाकार घेतला.
“अण्णा गायकवाड हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता, त्याच्या जाण्याने कुटुंब मोडून पडले आहे, लहान लहान लेकरांना आधाराची गरज आहे, आम्ही होईल ती मदत करुच पण मागील काही दिवसांपासून निवडणूकीच्या निमित्ताने खासदार आमदार गावात येऊ येऊ गेले पण कुणीही या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, गावातील लोकांनी सुद्धा या परिवाराला आधार दिला पाहिजे “
लक्ष्मण अभंग
(प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शेवगाव तालुकाध्यक्ष)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments