Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाघृष्णेश्वर अर्बन'च्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

घृष्णेश्वर अर्बन’च्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

घृष्णेश्वर अर्बन’च्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न
Nagar Reporter
Online news Natwork
शेवगाव :
अध्यात्मिक विचाराने प्रेरीत होऊन समाजप्रबोधन करणारे अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी सुरु आहेत. भजन, किर्तन, हरिपाठ, रामायण, काकडा, भारुड अशा अनेक कार्यक्रमाची रेलचेल ८ दिवस सप्ताहामध्ये चालते. ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने व पवित्र भावनेने सप्ताहात सहभागी होतात. पण गोळेगाव (ता.शेवगाव, जि.अहमदनगर) येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एक अनोखा, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
बुधवार रोजी घृष्णेश्वर अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि. बोधेगाव यांचे संयुक्त विद्यमाने मौजे गोळेगाव, ता. शेवगाव,जि. अहमदनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आनंदऋषीजी नेत्रालय, डॉ सुनिल बडे हृदयरोग तज्ञ, डॉ प्रमोद जाधव डॉ योगेश फुंदे स्त्रीरोग तज्ञ डॉ सरोजीनी फुंदे डेंटल सर्जन डॉ कराड डेंटल सर्जन डॉ चव्हाण डॉ दिपक फुंदे डॉ सोनाली तिडके वैद्यकिय अधिकारी डॉ मेहेर डॉ किरण कवडे डॉ गुजर सरोदे सिस्टर आशावर्कर्स आदी टीमद्वारे सुमारे 740 रुग्णांची डोळे दात हिमोग्लोबीन रक्तगट स्त्रीरोग जनरल आजार मोफत चिकीत्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये जवळजवळ 740 रुग्णांची मोफत सर्वरोग तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी भगवानगड घृष्णेश्वरचे चेअरमन सौ. द्वारकाबाई अर्जुनराव फुंदे, व्हाइस चेअरमन सौ. मंगलताई सुरेशराव ढाकणे, गोळेगावचे सरपंच, उपसरपंच व सर्व प्रतिष्ठीत मंडळी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून घृष्णेश्वर अर्बनच्या माध्यमातून अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जात आहेत. त्यांचा गरजू लोकांना निश्चितच फायदा होत आहे. त्यातीलच मोफत सर्वरोग चिकीत्सा शिबिर हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. कारण गावातील व परिसरातील 740 रुग्णांना मोफत सर्वरोग चिकीत्सा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी परिसरातील सर्व भक्तजन, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वितेसाठी घृष्णेश्वर अर्बनचे संस्थापक श्री. भगवान फुंदे सर, श्री.सुरेशराव ढाकणे सर, बाळासाहेब फुंदे श्री. अर्जुनराव फुंदे, बंडू फुंदे श्री. राजेंद्र डमाळे, श्री.बाबासाहेब फुंदे, भागवत रासिनकर, नेमिनाथ धोंगडे , शरद फुंदे,महादेव फुंदे, सुखदेव फुंदे, शंकर फुंदे, अमोल फुंदे, भागवत डमाळे, शेख मामु , कल्याण बर्डे संदीप साळवे, चांगदेव सानप, मोहन धोंगडे किरण फुंदे सुरेश फुंदे, गोपिनाथ धोंगडे, बाळू , दराडे, गणेश सानप नवनाथ सानप, पांडू दराडे लक्ष्मण सानप, सह सरपंच, उपसरपंच,सोसायटी चेअरमन,अखंड हरीनाम सप्ताह कमेटी, ग्रामस्थ आदींनी खुप श्रम घेतले. त्यामुळेच मोफत सर्वरोग चिकीत्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंचक्रोशीतील सर्व लोकांनी शिबिराचे खुप कौतुक केले. तसेच घृष्णेश्वर अर्बनच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments