Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedखा.सुजय विखे यांच्या प्रचार कार्यालयाचे चिंचपूर पांगुळ येथे उदघाटन...!

खा.सुजय विखे यांच्या प्रचार कार्यालयाचे चिंचपूर पांगुळ येथे उदघाटन…!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :-
अहिल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे
महायुतीचे उमेदवार अधिकृत उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ टाकळी मानूर गणातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे स्थान असलेली वडगांव-ढाकनवाडी,जोगेवाडी,चिंचपुर पांगुळ-मानेवाडी पंचक्रोशी म्हणून तालुक्यात पहिले जाते. त्याचाच भाग म्हणून चिंचपूर पांगुळ(ता.पाथर्डी) येथे प्रचार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज (ता.६) रोजी भाजप नेते धनंजय बडे,ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य विष्णू शंकर खाडे,उपसरपंच आजीनाथ बडे,यांच्या हस्ते दिमाखात पार पडले.चिंचपुर पांगुळ येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल्याने यावेळी निवडणुकीत खा. सुजय विखे पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचा विश्वास महायुतीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी विष्णू खाडे,आजीनाथ बडे,सोमनाथ बडे,विजय केदार,बबन खंडागळे,लक्ष्मण साळवे,पोपट बडे,अशोक बडे,दगडू बडे,दत्तात्रय बडे, आजीनाथ बडे,मधुकर बडे,आबासाहेब बारगजे,महेंद्र खर्डे,शिरसाट,आदींसह नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments