Sunday, May 19, 2024
Homeराजकीयएक कुटूंब कसे वाईट आहे यावर विरोधक निवडणूक लढवत आहेत;खा.विखे.

एक कुटूंब कसे वाईट आहे यावर विरोधक निवडणूक लढवत आहेत;खा.विखे.

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :
देशातील हि पहिली निवडणूक आहे की विकासावर चर्चाच होतच नाही.हि पहिली अशी निवडणूक आहे कि भाषणातून मी असा विकास केला आहे. त्यामुळे मला मतदान करा.असा विचारच नाही तर एक कुटूंब कसे वाईट आहे यावर हि निवडणूक विरोधक लढवत आहेत.,परंतु ही निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. असे प्रतिपादन चिंचपुर पांगुळ येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात बोलतांना अहिल्या नगरचे विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे,भगवान आव्हाड, भाजप नेते धनंजय बडेपाटील, भाजप नेते अमोल गर्जे,मा.नगराध्यक्ष अभय आव्हाड,डॉ.मृत्युंजय गर्जे,ऍड.प्रतीक खेडकर, भगवान दहिफळे ,अमोल आंधळे,अजय रक्ताटे, भगवान आव्हाड,अशोक बडे, शिवसेना नेते अंकुश चितळे, विष्णू ढाकणे अशोकराव चोरमले आदींसह टाकळीमानुर गणातील बूथ कमिटीचे सदस्य व भाजपाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


पुढे बोलतांना विखे म्हणाले की, पाथर्डी तालुका हा मुंढे साहेबांना माननारा आहे.समोरच्या पक्ष्याचा नेता हे शरद पवार आहेत.आणि उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांना जाणीवपूर्वक राजकीय कोणी किती त्रास दिलेला आहे.आणि आजही पंकजाताई मुंडे यांना अडचणीत आणणारे नेते कोण?असे म्हणत शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. परंतु मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्व.बाळासाहेब विखे पाटील हे होते.म्हणून या जिल्ह्यात शरद पवार यांचे मनसुबे सफल झाले नाहीत.
ज्यांना देशाचा नेता व्हायचे आहे; त्यांचे फक्त सात लोकं निवडणुकीला उभे आहेत.केंद्रात दहा वर्षे मंत्री असताना शेतकऱयांचा कधी प्रश्न सोडवावासा वाटला नाही?कांदा उत्पादकांचा प्रश्न का सोडवला नाही?,दूध उत्पादकांचा प्रश्न का नाही सोडवला? ऊस उत्पादक शेतकरी यांचा प्रश्न का नाही सोडवला?याचे उत्तर जनतेला द्यावेच लागेल.असेही सुजय विखे म्हणाले. त्यामुळे देशाचे भवितव्य अवलंबून असणारी ही निवडणूक आहे.देश कोणाच्या हातात द्यायचा याची हि निवडणूक आहे. तर सुजय विखे साठी नसून आपल्या मुलाचे भविष्य कोणाच्या हातामध्ये द्यायचे आहे तर नरेंद्र मोदी यांच्या सारख्या देशाभिमानी नेत्याच्या हाती देण्यासाठी हि निवडणूक होत आहे.महाराष्ट्राचा चाणक्य स्वतःला समजता मग मागील तीन वर्षे सत्ता भोगून सुद्धा एक साधा बंधारा सुद्द्धा या तालुक्याला देऊ शकले नाहीत मी व आ.मोनिका राजळे यांनी प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहे. तालुक्याचा निधी तीन वर्षे दाबून ठेवला का तर फक्त एक महिला भाजप आमदार होती म्हणून?तुम्ही पाथर्डी तालुक्यासाठी काय योगदान दिले आहे?ते सांगा आणि मग तुमच्या उमेदवारास मते टाकण्यास सांगा. हि निवडणूक सुजय विखे व समोरची व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या नेत्याच्या अस्तित्वाची निवडणूक आहे.मी रोज तुमच्यात येऊ शकणार नाही पण तुमचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.२२२ रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सहा महिने रोज प्रत्येक कार्यालयात हेलपाटे मारत होतो. कारण ज्या तालुक्यांनी सर्वाधिक मताधिक्य दिले त्या तालुक्याचा रस्ता खराब रहावा असे मला वाटतं नाही.पदाचा मोह आमच्या कुटूंबाला कधीच न्हवता आणि नसणार आहे.पैशाची कमतरता आमच्याकडे कधी नव्हती आणि कधी नसणार परंतु पैसे असून गोरगरीब जनतेसाठी तो खर्च करण्याची दानत विखे कुटूंबाकडे आहे.एखाद्या सांगत असेल की माझ्याकडे काहीच नाही आणि जर त्याच्याकडे तुम्ही काही कामाचा अर्ज घेऊन काही मागण्यास गेले तर तो सांगेल कि मी आधीच सांगितले होते की, माझ्याकडे काहीच नाही.एखादा रस्ता तयार करण्यात आला आणि एखादा किलोमीटर पुढे शिल्लक राहिला आणि त्यावर त्यास मुरूम टाकून द्यावा असे सांगितले तर समोरून उत्तर येणार मी आधीच सांगितले होते माझ्याकडे काहीच नाही. अशी बोचरी टीका प्रतिस्पर्धी उमेदवार यांचे नाव न घेता केली.गावपातळीवर थांबून घराघरात मोदी सरकार च्या योजना जाऊन सागा देशाचे आजिबात टेंशन घेऊ नका, कामाला सुरुवात करावी असे यावेळी उपस्तीत पदाधिकार्यांना कानपिचक्या दिल्या.
आमदार मोनिकाताई राजळे बोलतांना म्हणाल्या की,प्रत्येक वाडीवस्तीवर आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.डॉ सुजय विखे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.त्यामुळे आपली जबादारी आहे की जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून कसे देता येईल.यावेळी धनंजय बडे,प्रतीक खेडकर,भगवान दहिफळे,अशोकराव चोरमले आदींची भाषणे झाली.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (0.26999965, 0.636823);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 47;
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments