Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedयेळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन हभप. रामगिरी महाराज व ढाकणे यांचे हस्ते...

येळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन हभप. रामगिरी महाराज व ढाकणे यांचे हस्ते संपन्न.

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,

पाथर्डी– मागील पाच वर्षात प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न करत प्रत्येक गाव वाडी वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायत हद्दीला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला विकास काम करताना आम्ही जात पंथ धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही ही शिकवण आमची आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले.आज सकाळी(ता.३०) रोजी येळी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या विशेष पाठपुरावातून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन हभप.रामगिरी महाराज यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रतापराव ढाकणे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,महारुद्र कीर्तने, माजी नगरसेवक बंडू पाटील, बोरुडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, वैभव दहिफळे,युवक नेते शंकर बडे, निळकंठ आव्हाड,दिलीप सोळसे, विष्णू थोरात,पांडुरंग कराड, आबासाहेब जायभाये,अनिल बंड, मल्हारी घुले,कालिदास गरजे, शिवदास गर्जे,सुभाष गर्जे, सुनील ढाकणे,अनिल जाधव, अशोक ढोले आदी उपस्थित होते.


प्रतापराव ढाकणे म्हणाले स्वार्थी राजकारणासाठी ढाकणे कुटुंबीयांनी कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही तसेच राजकारण करताना शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेमध्ये जातीभेद निर्माण केला नाही लोकांची कामे करणे म्हणजे राजकारणात आपण त्यांच्यावर उपकार करतो असे नाही तर लोकांमुळेच स्वर्गीय बबनराव ढाकणे दिल्लीत देशाच्या राजकारणात पोहोचले त्याची जाणीव आज आम्हालाही आहे म्हणून मागील तीस वर्षांपासून मी दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी अविश्रांत कार्यरत आहे राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा आहे त्या जनतेने आम्हाला सर्व काही दिले त्यांच्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहु. संघर्ष करणे हाच आणि अन्याय विरोधात उठाव निर्माण करणे हाच आमचा स्थायीभाव आहे भविष्यात राजकीय दृष्टिकोनातून काहीही घडले तरी मी या वारशाला कधीही सोडणार नाही. येळी व परिसरात साठी प्रभावती ढाकणे जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी दिला त्याचा मी टक्केवारी मागत नाही आणि भविष्यातही मागणार नाही.


कारण माझा प्रपंच राजकारणावर अवलंबून नाही. कोरडगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून पिळवणूक सुरू होती ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार आपण मागील दोन वर्षांपासून केदारेश्वर कारखान्याला ऊस नेतोय तिथे कुणाची वशिलेबाजी चालत नाही नोंदीनुसार सर्वांचा ऊस रीतसर पद्धतीने गाळप केला जातो. आणि ऊस उत्पादकांचे पेमेंटही वेळेवरच त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. आपल्याच तालुक्यातील एक कारखाना जो केदारेश्वर पेक्षाही जुना आहे त्या कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांचे सर्वांचे पैसे थकीत आहेत.

केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अवघे २५कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि या कारखान्याची मालमत्ता १७८ कोटी रुपयांची आहे. तर आमचे प्रतिस्पर्धी यांच्या कारखान्याचा वाटचाल व इतिहास तपासलां तर मालमत्ता कमी आणि शेकडो कोटी रुपयांचे कर्जात बुडालेले आहेत हे कशामुळे होते त्याचा विचार करण्याची गरज आज शेतकऱ्यांना आहे हजारो कोटींच्या विकासाच्या गप्पा मारता मात्र विकास अक्षरशः मातीत मिसळला जातोय हे संपूर्ण मतदारसंघात दिसून येत आहे.

दुलेचांदगाव ते कोरडगाव रस्ता याची काय अवस्था ठेकेदारांनी करून ठेवली आणि अशा ठेकेदारांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी त्याला कारणीभूत आहेत.एकतर्फी कारभारातून मागील दहा वर्षापासून या मतदारसंघातील सामान्य जनतेची पिळवणूक सुरू आहे कोणतेही काम घेऊन गेले तर त्या गावातून आपल्याला किती मते मिळाली याची कागद पाहून काम करायचे की नाही याचा निर्णय घेतला जातो.

हे लोकशाहीसाठी अंत्यत घातक आहे.या जुलमी राजवटीतून बाहेर पडण्यासाठी परिवर्तन करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन प्रतापराव ढाकणे यांनी केले. प्रास्ताविक शंकर बडे यांनी केले तर सूत्रसंचालन तसेच आभार विकी डमाळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments