Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत होणार ,ॲड.ढाकणे यांच्या युवा संवाद अभियानाचा समारोप...

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत होणार ,ॲड.ढाकणे यांच्या युवा संवाद अभियानाचा समारोप…

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे
,पाथर्डी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी महिनाभरापासून सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा येत्या सोमवारी दि.२९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी.११ वा.प्रसिद्ध सिनेकलाकार तथा खासदार डॉ .अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे समारोप होणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महारूद्र किर्तने व युवक शहराध्यक्ष देवा पवार यांनी दिली.
याबाबत सविस्तर अधिक माहीती देताना किर्तने व पवार म्हणाले की,ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील महाविद्यालयात जात महाविद्यालयीन तरूण- तरूणींशी संवाद साधला महाराष्ट्रातील व देशातील आजची राजकिय, समाजीक,शैक्षणिक परिस्थिती आणि त्याचा भविष्यात होणारा परिणाम या सर्व घडामोडीमुळे आजचे विद्यार्थी जेंव्हा व्यावसायिक जीवणात पदार्पन करतील त्यावेळी त्यांचे समोरील संभाव्य समस्यांचा उहापोह ढाकणे यांनी महिन्याभरात केला.

आज वाढती बेरोजगारी, शासकिय नोकर भरतीतील सावळा गोंधळ यामुळे तरूण व तरूणींमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. याच सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी ॲड.प्रतापराव ढाकणे दोन्ही तालुक्यातील जवळपास चाळीस महाविद्यालयातील हजारो विद्यार्थांशी संवाद साधला.

या संवाद यात्रेस प्रचंड प्रतिसाद लाभला या आभियानाच्या समारोपासाठी व तरूणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन पाथर्डी शहरातील ओपन थिएटर येथे सोमवारी (दि.२९) रोजी सकाळी.११ वा.युवा महासंवाद समारोप सोहळा आयोजीत करण्यात आला असून मतदार संघातील सर्वांनी यासाठी उपस्थित रहावे असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किर्तने व पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments