Monday, May 20, 2024
Homeक्राईमनगरात वकीलावर पक्षकाराचा धारधार शस्त्राने हल्ला : हल्लाखोर कोतवाली पोलिसांकडून अटक

नगरात वकीलावर पक्षकाराचा धारधार शस्त्राने हल्ला : हल्लाखोर कोतवाली पोलिसांकडून अटक

नगरात वकीलावर पक्षकाराचा धारधार शस्त्राने हल्ला : हल्लाखोर कोतवाली पोलिसांकडून अटक
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यानगर
: नगरात वकीलावर हल्ला करणा-यांस कोतवाली पोलिसांनी पकडले. अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. हनुमान मंदीराचे पाठीमागे, गांधीनगर, बोल्हेगाव, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांनी दिलेल्या सुचनेनूसार गुन्हे शोध विभागाचे सपोनि योगिता कोकाटे पो.कॉ.तानाजी पवार, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, सुरज कदम, सुजय हिवाळे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.८ मे २०२४ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ॲड. मयूर अशोक कोल्हे व त्यांचे वडील ॲड.अशोक कोल्हे (रा. बसस्थानकाजवळ, लोणी हवेली, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हे त्यांच्या कोर्ट कामकाजानिमित्ताने आलेले होते. दुपारी ४.३५ वाजण्याच्या सुमारास ॲड.अशोक कोल्हे हे नगर जुन्या न्यायालय येथे असताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड याने काहीएक कारण नसताना तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून हातात धारधार शस घेऊन त्यांचेवर धाऊन जाऊन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अॅड. श्री. अशोक कोल्हे यांचे डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नगरमधील मॅक्सकेअर येथे आयुसीयु विभागात औषोधोपचार चालू आहेत.
दि. ८ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणूक सन २०२४ अनुशंगाने अहमदनगर शहरात महत्वाचे व्हीव्हीआयपी बंदोबस्त चालू होते. या घटनेची माहीती एसपी राकेश ओला यांना समजताच त्यांनी वकीलावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोनि. प्रताप दराडे यांना कोणत्याही परिस्थितीत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणेबाबत सूचना केल्या. कोतवाली पोलिस ठाणे टिम घटनाठिकाणी रवाना होऊन आरोपीची माहीती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शोध टिमचे अंमलदार यांनी घटनाठिकाणी तसेच मॅक्सकेअर हॉस्पिटल,नगर येथे जाऊन घटनेची माहीती घेतली. ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करणारा हा त्यांचा पक्षकार आहे. त्याचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड ( रा. हनुमान मंदीराचे पाठीमागे, गांधीनगर, बोल्हेगाव, अहमदनगर) असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजले. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो पळून गेला तर लवकर मिळून येणार नाही,या करिता पो.नि. प्रताप दराडे यांचे आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आरोपी याची गोपणीय रित्या माहीती घेऊन त्याचा पोलीस ठाणे हद्दीत तसेच त्यांच्या रहात्या पत्यावर जाऊन एक तास शोध घेतला असता तो बोल्हेगाव, अहमदनगर परिसरात मिळून आल्याने त्यास गुन्हा दाखल होण्याआधीच ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेबाबत ॲड.अशोक कोल्हे यांचा मुलगा मयूर अशोक कोल्हे यांनी घटनेची त्यांच्या वडील यांच्याकडून पूर्ण माहीती घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून अनिल लक्ष्मण गायकवाड याच्याविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ५७२/२०२४ भादंवि क. ३०७,५०४,५०६ आर्म ॲक्ट ४/२५ सह क्रिमी. लॉ. ॲमेनमेंट कलम ७ प्रमाणे दि.९ मे २०२४ रोजी १.१८ वा. गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास स.पो.नि. योगिता कोकाटे या करित आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments