Sunday, May 19, 2024
Homeक्राईमकोयता, तलवार बाळगून दहशत करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी पकडले

कोयता, तलवार बाळगून दहशत करणाऱ्यास एमआयडीसी पोलीसांनी पकडले

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
एमआयडीसी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या धारदार कोयता व तलवार बाळगून मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण करणाऱ्यांना पकडण्याची कारवाई एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर तालुका ग्रामीण डिवाएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी प्रभारी , पोसई दिपक पाठक, पोसई चाहेर, पोहेकॉ नंदकुमार सांगळे, पोहेकॉ राजपुत, पोना विष्णु भागवत, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ सुरज देशमुख, पोकाॅ नवनाथ दहिफळे, पोकाॅ सानप, मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३ जानेवारी २०२४ ला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांना माळवाडी चौक, (वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) येथे एकजण हातात अवैधरित्या धारदार कोयता बाळगून मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण करत आहे. ही माहिती मिळाल्याने सपोनि माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन ठिकाणी पाठवले. ठिकाणी एकजण हातात धारदार कोयता घेऊन मोठमाठ्याने ओरडून दहशत निर्माण करुन संशयितरित्या फिरताना दिसला. तो आम्हाला पाहून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करुन पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेष शिरीष रणदिवे (वय २१, रा. माळवाडी चौक वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याच्या हातातील कोयता पोहेकाॅ सांगळे यांनी दोन पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला.
त्यास एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (३) (१), ११०/११७ प्रमाणे फिर्याद दिली आहे.
तसेच सहयाद्री चौक येथे एकजणाच्या हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. अशी गोपनीय माहिती सपोनि माणिक चौधरी यांना मिळाल्याने ठिकाणी पोलीसांची टिम पाठवून हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्यास जागीच पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ राजु केदारे (वय २१, रा.उभा मारुतीमागे बोल्हेगाव, गांधीनगर ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याच्या हातातील धारदार शस्त्र पोहेका सांगळे यांनी ताब्यात घेऊन दोना पंचासमक्ष जप्त केले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (३) (१), ११०/११७ प्रमाणे फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments