Friday, May 10, 2024
HomeUncategorizedमिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टीवर छापे ;...

मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टीवर छापे ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलवर विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री करणारे व गावठी हातभट्टी दारु तयार करणारे ८ जणांवर कारवाई करुन ४ लाख १८ हजार ६६५ रुपये किंमतीची दारु अहमदनगर एलसीबी टिम’ने जप्त केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत डिवायएसपी विवेकानंद वाखारे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ अतुल लोटके, गणेश भिंगारदे, पोकॉ सागर ससाणे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालींदर माने, चापोकॉ अरुण मोरे यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबीचे स्वतंत्र दोन टिम नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. एलसीबी टिम’मधील पोलीस अंमलदार यांनी मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.२३ जानेवारी २०२४ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ८ ठिकाणी छापे टाकून एकूण ४ लाख १८ हजार ६६५ रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये २ लाख ६८ हजार ६६५ रुपये किमतीची देशी विदेशी, गावठी हातभट्टीची दारु, रसायन व १ लाख ५० हजार रुपये किमतीची इंडिका कार जप्त करुन ८ आरोपीं विरुध्द मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस ठाण्यात येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ८ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल

  1. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 25/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) शरद श्रीमंत नालकोल रा. नालकोल, ता. आष्टी, जि बीड 11,975/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु
  2. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 26/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) शंकर श्रीपती कोरडे रा. तिखी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 2100/- रुपये किमतीची देशी दारु
  3. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 27/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) सुधीर अंबादास मिंड रा. खुरंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 10,545/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु
    4 मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 28/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) तुकाराम नंदराम लामटोळे रा. चांदे बु, ता. कर्जत, जि. अहमदनगर 2,20,360/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु व त्यामध्ये 1,50,000/- रुपये किमतीची इंडिका कार
    5 कर्जत पो. ठाणे गु.र.नं. 32/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) विठ्ठल जालींदर गोंजारे रा. बर्गेवाडी, कर्जत, जि. अहमदनगर 4200/- रुपये किमतीची विदेशी दारु
    6 कर्जत पो. ठाणे गु.र.नं. 33/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई)
    रामदास महादु नेटके रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 1,34,485/- रुपये किमतीची विदेशी दारु
    7 नगर तालुका पो. ठाणे गु.र.नं. 39/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) गोरख अर्जुन गव्हाणे रा. वाळुंज, ता. जि. अहमदनगर 23,000/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व रसायन
    8 नगर तालुका पो. ठाणे गु.र.नं. 40/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) कानिफनाथ भिमाजी कळमकर रा. नेप्ती शिवार, ता. जि. अहमदनगर 12,000/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व रसायन
    एकुण 08 आरोपी
    4,18,665 /- रु.कि.ची देशी विदेशी दारु, गावठी हातभट्टीची तयार दारु, रसायन व 1,50,000/- रुपये किमतीची इंडिका कार
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments