Monday, May 20, 2024
Homeक्राईमबँक भरण्याची रक्कम लंपास करणाऱ्यास २४ तासात एलसीबी टिम'ने पकडले

बँक भरण्याची रक्कम लंपास करणाऱ्यास २४ तासात एलसीबी टिम’ने पकडले

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
शहरातील व्यापाऱ्याने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोख रक्कम लंपास करणाऱ्यास २४ तासात पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून ९ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. सुशिल प्रकाश बिरादार (वय २९, रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड, अ.नगर मुळ रा. गुरुनानक झिरा, गुरुद्वाराजवळ, ता. जि. बिदर, कर्नाटक ) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, प्रभारी नगर शहर डिवायएसपी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि तुषार धाकराव, पोहेकॉ संदीप पवार, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ अमृत आढाव, प्रशांत राठोड आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२३ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र ट्रेडर्स नावाचे दुकानामध्ये काम करणारा सुशिल प्रकाश बिरादार (रा. वाणीनगर, अहमदनगर) याचेकडे बँक खात्यामध्ये भरणा करण्यासाठी १० लाख रुपये रोख रक्कम दिली होती. सुशिल बिरादार याने त्याचे ताब्यातील रोख रक्कम बँकेमध्ये न भरता रोख रक्कम घेऊन पळून गेला होता, या प्रताप प्रेमचंद इर्दवानी (रा. सुरभी हॉस्पीटल समोर, गुलमोहोर रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७९/२०२४ भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दाखल गुन्ह्याचा एसपी राकेश ओला यांनी तपास लावून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना दिले होते.‌ एलसीबी टिम’ने आरोपीचे वास्तव्याची माहिती काढली असता आरोपी हा बिदर, कर्नाटक येथील राहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एलसीबी टिम’ने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेण्याकामी बिदर, कर्नाटक येथे जात असतांना एलसीबी टिम’ला आरोपीहा मोहोळ बस स्टँड (जि. सोलापुर) या ठिकाणी थांबलेला असल्याची व तो तेथून कर्नाटक येथे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांची मदत घेऊन मोहोळ बसस्टँड या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत असतांना आरोपीहा बसची वाट पाहत असतांना बस स्टँडवर मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सुशिल प्रकाश बिरादार ( रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर मुळ रा. गुरुनानक झिरा, गुरुद्वाराजवळ, ता. जि. बिदर, कर्नाटक) असे असल्याचे सांगितले.
आरोपीची झडती घेता त्याचेकडे असलेल्या काळे रंगाचे सॅकमध्ये गुन्ह्यातील गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ९ लाख ४१ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असे मिळून आले आहे. आरोपी यास पुढील तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले. पुढील तपास कोतवाली पोलीस हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments