Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedबीड लोकसभेची निवडणूक कुठल्याही एका "जाती,धर्माची" नसून "जाती आणि धर्माच्या", भिंतीच्या पलीकडे...

बीड लोकसभेची निवडणूक कुठल्याही एका “जाती,धर्माची” नसून “जाती आणि धर्माच्या”, भिंतीच्या पलीकडे असणार..!

👉भगवानगड येथून मला दिल्ली नेहमीच दिसत राहील .

👉बीड लोकसभेची निवडणूक व्यक्तीची नाही तर विचारधारेची. -पंकजा गोपीनाथ मुंडे

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे ,
पाथर्डी: बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे असणार आहे .बीड लोकसभेला माझ्याविरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र मोहटादेवी येथे पत्रकार परिषदेत केले भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटादेवी गडअशी भव्य रॅली काढत जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या साह्याने प्रचंड मोठा हार घालत स्वागत केले. यावेळी मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर,डॉ मनोरमा खेडकर, दीपा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला यावेळी खासदार सुजय विखे ,आमदार मोनिका राजळे ,जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, अरुण मुंडे अभयराव आव्हाड, तुषार वैद्य मृत्युंजय गर्जे,धनंजय बडेपाटील, गोकुळ दौंड अमोल गर्जे मुकुंद गर्जे, अजय रक्ताटे,प्रतीक खेडकर,तसेच भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामाच्या माध्यमातून आपली जबाबदारी पार पाडली आहे निश्चितच त्यांची ही विकासात्मक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल असा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ.सुजय विखेंच्या प्रचारासाठी मी नगर जिल्ह्यात आले होते.यंदाही आले आणि सुजय विखे यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.सुजय यांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.

👉 – शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याची भावना पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते. भविष्यातील राजकारणाचा वेध आणि निर्णय भाजप पक्ष नेतृत्व घेईल.असे सांगत या विषयाला पूर्णविराम दिला.बीड लोकसभेची निवडणूक ही जात, धर्म ,पंथ या भिंतीच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीतील उमेदवार जो असेल त्याच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासासी होईल व त्यासाठी मोहटादेवीस साकडे घालत लोकसभा विजयाचा कार्यकर्त्यासह संकल्प केला आहे.

-पंकजा मुंडे राष्ट्रीय सचिव भाजप

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments