Thursday, May 9, 2024
Homeक्राईमपाथर्डी पोलिस ठाण्यावर सर्व पक्षीय मोर्चा, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे, प्रतापकाका ढाकणे...

पाथर्डी पोलिस ठाण्यावर सर्व पक्षीय मोर्चा, ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे, प्रतापकाका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

पाथर्डी पोलिस ठाण्यावर सर्व पक्षीय मोर्चा
👉 ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे व प्रतापकाका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
👉शहरासह तालुक्यातील गुंडगिरीचा व अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे

पाथर्डी-
शहरातील होत असलेल्या गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यात यावा, मोठ्या प्रमाणात शहरासह तालुक्यात चालू असलेले अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी गुरुवारी (दि.२१ मार्च) पाथर्डी शहर बंद करत पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शपगट) नेते ॲड. प्रतापकाका ढाकणे यांनी केले. पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.

सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये शिवसेना नेते विष्णू ढाकणे,राष्ट्रवादीचे(शपगट)तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे ,उभाठा सेनेचे भगवान दराडे, बंडू बोरुडे, राष्ट्रवादीचे नेते(शपगट)गहिनीनाथ शिरसाठ,सीताराम बोरुडे, पंकज बाफना, आजिनाथ भाबड, शिवाजी दहिफळे, महादेव दहिफळे,संजय दहिफळे, पालवे गुरुजी आदींसह मोठ्या संख्येने पाथर्डी तालुक्यातील व्यापारी,व नागरिक सहभागी झाले होते.शहरातील गुंडगिरी संपलीच पाहिजे,अवैध धंदे बंद करा अशा घोषणा देत हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चा पाथर्डी पोलिस ठाण्यावर गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे यांनी यावेळी घरावर पडलेला दरोड्याचा ,तसेच आरोपींनी केलेल्या मारहाणीचा थरारक अनुभव यावेळी सांगितला,तर विष्णू ढाकणे यांनी सांगितले की इथून पुढे जर आमच्या केसाला जरी धक्का लागला तर पवार आणि त्याचे सहकारी जबादार असतील.त्यानंतर मात्र आम्ही आंदोलन करणार नाहीत तर त्याचा मुळासकट बंदोबस्त करू. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करीत पाथर्डीतील गुन्हेगारी कायमची संपवावी, असेही त्यांनी म्हटले.


यावेळी बोलताना ॲड. प्रतापकाका ढाकणे म्हणाले, शहरातील गुंडगिरीने डोके वर काढले असून शहरात कुठेही पोलिसांचे अस्तित्व दिसून येत नाही. खुलेआम मटक्याच्या टपऱ्या, वेडीवाकडी लावलेली वाहने, मुलींची होणारी छेडछाड, लोकांचे भूखंड बळजबरीने ताबा घालून बळकावणे,दरदिवशी होणाऱ्या माऱ्यामाऱ्या यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. दोन्ही बसस्थानकांवर खिसेकापूंचा सुळसुळाट झाला आहे. गुंडगिरी मोडून काढा. पाथर्डी एवढी गुंडगिरी कुठेहि दिसून येत नाही. सर्वसामान्य माणूस शांत आहे, एकदाच संबंधित गुंडांचे कंबरडे मोडून काढा; अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

👆संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी व संघटित गुन्हेगारीस आळा घालावा यासाठी पोलिसांना निवेदन देतांना सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments