Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिककिर्तनाच्या माध्यमातून "मतदान जनजागृती" मोहीमेअंतर्गत तालुका स्तरीय "जनजागृती पथकाचे"मतदान करण्याचे आवाहन...!

किर्तनाच्या माध्यमातून “मतदान जनजागृती” मोहीमेअंतर्गत तालुका स्तरीय “जनजागृती पथकाचे”मतदान करण्याचे आवाहन…!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे ,पाथर्डी
:तालुक्यातील वडगांव येथे हभप.वै.पुंडलिक महाराज गहिनीनाथगडकर (चिंचोली नाथ)यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित काल्याचे किर्तनामध्ये मतदान जागृती मोहीमेअंतर्गत तालुका स्तरीय जनजागृती पथकाने आज(ता.२१मार्च) रोजी मतदान करण्याचे आवाहन करत जनजागृती केली.शाहीर भारत गाडेकर, चव्हाण,साळवे,यांनी गीत गायन तसेच भारूडाच्या माध्यमातुन मतदान करण्यासाठी जनजागृती केली.या प्रसंगी हभप.अजिनाथ आंधळे महाराज यांनी आपल्या किर्तनवाणीतून गावातील जनतेला मतदानाचे महत्व पटवून दिले. व मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडत मतदान करण्याचे अवाहन केले. यावेळी केंद्र प्रमुख उद्धव बडे,शिक्षक नेते अण्णासाहेब आंधळे,बाळासाहेब गोल्हार,हभप.शिवाजी महाराज गरड माजी केंद्रप्रमुख सुनील बडे,परमेश्वर गरड, रामनाथ ढाकणे,जनार्धन बडे,आजिनाथ बडे, बाबासाहेब शेळके, माजी सरपंच धनवे ,प्रल्हाद महाराज बडे,मुख्याध्यापक प्रभाकर बडे ,जायभाये, मोरे तसेच गावातील अनेक महिला, पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मतदान प्रतिज्ञा वाचन करून “जागर मतदानचा” किर्तनाच्या माध्यमातून शेवट करण्यात आला.


त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव व माध्यमिक विद्यालय वडगाव येथेही “मतदान जनजागृती” मोहीम उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थामध्ये रांगोळी, चित्रकला, निंबंध व घोषवाक्य स्पर्धा चे आयोजन करून मतदान करण्याचे महत्व अधोरेखित करत मतदान जनजागृती केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल खेडकर यांनी केले. तर व्हिडीओ ग्राफी अजिनाथ पालवे, महारुद्र बडे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप नोडल अधिकारी रामनाथ कराड यांनी आगामी निवडणूकीमध्ये सर्व वयोगटातील मतदारांना मतदान करण्याचे अवाहन करत आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments