Thursday, May 9, 2024
Homeक्राईमपोखर्डी येथे गांजा झाडाची लागवड करणाऱ्यावर नगर एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पोखर्डी येथे गांजा झाडाची लागवड करणाऱ्यावर नगर एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पोखर्डी येथे गांजा झाडाची लागवड करणाऱ्यावर नगर एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर
: पोखर्डी येथे गांजा झाडाची लागवड करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त करण्याची एमआयडीसी पोलीसांनी कामगिरी केली आहे. यादव नाना साबळे (रा. पोखडी ता.जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि अरुण आव्हाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज मोंढे, सफौ. काळे, पोहेकाॅ नितीन उगलमुगले, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकाॅ राजु सुद्रिक, पोहेकाॅ कावरे, पोहेकॉ दिवटे, पोहेकाॅ महमद शेख, पोना महेश बोरुडे, चालक पोहेकाॅ गिरवले, पोकाॅ किशोर जाधव, पोकाॅ नवनाथ दहिफळे, पोकाॅ जयसिंग शिंदे, पोकॉ उमेश शेरकर, पोकाॅ वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांनी अवैद्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यावरुन दि.२२ मार्चला एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुपा पोलिस ठाण्याचे पोनि अरुण आव्हाड व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार करुन त्या ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकला. या छाप्यात पोखडी गावामध्ये शेतात गांज्याचे झाडाची लागवड केल्याची मिळून आले. शेतमालकाचे आजुबाजुला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव यादव नाना साबळे (रा. पोखडी ता जि. अहमदनगर) असे सांगीतले. गांज्याचे झाडे पंचासमक्ष जप्त करुन त्याचे वजन केले असता तेथे ३७ किलो वजनाची एकूण ९२ हजार ५०० रु. किमतीची गांजाची झाडे मिळून आले आहे. गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments