Saturday, April 27, 2024
Homeक्राईमपाथर्डी पोलिसांची पोलिसिंग ; पाथर्डी ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

पाथर्डी पोलिसांची पोलिसिंग ; पाथर्डी ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

पाथर्डी पोलिसांची पोलिसिंग ; पाथर्डी ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

माणिकदौंडी घाटातील लुटीप्रकरणी आरोपींना दि.२६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे
पाथर्डी-
तालुक्यातील भालगाव चौफुलीवर वँगनर गाडीत सुगंधी तंबाखु (गुटखा) विक्रीसाठी घेऊन जात असताना शनिवारी (दि.२२) पाथर्डी पोलिसांनी पकडले. या कारवाईत ४ लाख ४५ हजार ८७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात असून, शिवाजी महारथी बटुळे ( रा.भारजवाडी, ता. पाथर्डी, जि.अ.नगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सफौ. राजेंद्र म्हस्के, पोकाॅ.भाऊसाहेब खेडकर, आसाराम बटुळे असे तिघेजण गस्त घातल असताना माहिती मिळाली होती. एका गाडीमध्ये गुटखा वाहतूक केली जात आहे. दुपारी १२.१५ वाजता भालगावच्या सावरगाव रस्ता व खऱवंडी बीड रस्ता या चौफुल्यावर वाहन मारुती वॅगनर (एम.एच.१२ क्यु.२१६२) मधून महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा, वाहतूक व विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू व जर्दा/गुटखासदृष्य माल मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहीत असूनही स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी त्याची वाहतूक करत असतांना शिवाजी बटुळे हा मिळून आला.गाडीसर बटुळे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात आणले. त्याची चौकशी करुन सरकारी पंचासमक्ष शिवाजी महारथी बटुळे याच्याकडील मालाची पाहाणी केली. वरिष्ठ पोलिस अधिका-यांना माहिती दिली. पोकाॅ आसाराम बटुळे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात ताब्यात घेतलेल्याविरुद्ध भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि श्री मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी तांबे हे तपास करीत आहेत. खरवंडी परिसरातील अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

माणिकदौंडी घाटातील लुटीप्रकरणी आरोपींना दि.२६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी-
तालुक्यातील माणिकदौंडी घाटात मल्हारी भाऊसाहेब सोनवणे यांची चारचाकी गाडी दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी अडवून लूट केल्याप्रकरणी तुकाराम पवार व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील १३ ग्रँम सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्यात पवार व त्याच्या सहका-यांना दि‌.२६ मार्च २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्यात दरोड्याचे कलम वाढविण्यात आले आहे
.

याबाबत माहिती अशी की, दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी माणिकदौंडी घाटात मल्हारी भाऊसाहेब सोनवणे यांची चारचाकी गाडी अडवून तीन महिलांच्या गळ्यातील‌ १९.५० ग्रँम (सुमारे दोन तोळे) सोने लुटले होते. सोनवणे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली होती. पवार व त्यांच्या सहका-यांनी हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चोरीचे १३ ग्रँम सोने देखील दिले आहे. शनिवारी पोलिसांनी तुकाराम पवार व इतर पाचजणांना न्यायाधीश व्ही.आय.शेख यांच्या न्यायालयासमोर उभे केले होते. पोलिसांनी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागीतली होती. आरोपीच्या वतीने ॲड. राणा खेडकर व ॲड.महादेव आठरे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील प्रज्ञा गिते यांनी बाजू मांडली. सपोनि जगदिश मुलगीर हे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments