Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedपाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या सात जागा बिनविरोध;१० जागेसाठी ११ अर्ज.

पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या सात जागा बिनविरोध;१० जागेसाठी ११ अर्ज.

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे

पाथर्डी:खरेदी विक्री सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.सोसायटी मतदारसंघाच्या एकूण १० जागांसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल असून उर्वरित ७ जागांवरील संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. एका अर्जामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्याची वेळ आली आहे. निवडणूक बिनविरोध होईल अशी असताना मात्र एका उमेदवारी अर्जामुळे सोसायटी मतदारसंघात निवडणूक लागली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. नांगरे काम पाहत आहेत.

तालुका खरेदी विक्री संघाची सत्ता आमदार मोनिका राजळे यांच्या ताब्यात असून बिनविरोध निवडून आलेल्या सर्व जागा त्यांच्याच गटाच्या आहेत. उर्वरित सोसायटी मतदारसंघात ९६ मतदार संख्या असून मताच्या दृष्टीने बहुसंख्य मतदार आ. राजळे गटाचे आहेत. तालुक्यात विरोधक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते राष्ट्रवाडी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रसेखार घुले यांनी निवडणुकीपासून लांब रहाणे पसंत केले यापूर्वी बाजार

समितीची निवडणूक झाली तेथे आ. राजळे यांनी मतदानाच्या माध्यमातून एक हाती सत्ता घेतली. त्यानंतर तालुका खरेदी- विक्री संघातही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार राजळे यांनी प्रस्थापित उमेदवारांना धक्का देत नवख्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. हक्काच्या संस्थाच्या माध्यमातून सोशल आशा इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवून या निमित्ताने आमदार राजळे यांनी विधानसभा वाटचाल सुरू केली आहे.

. एकूण १७ सदस्या पैकी चार सदस्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजू लागतील. त्यावेळची परिस्तिती कशी असेल याची चुणूक आमदार राजळे यांनी एकप्रकारे दाखवून दिली आहे.

नगरपालिका अथवा पंचायत समितीला इच्छुक असणाऱ्यांना बाजार समितीत व तालुका संघात संधी उपलब्ध करून त्यांच्या नजरेतील अन्य उमेदवाराचा मार्ग मोकळा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसत आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिनविरोध निवडून आलेले संचालक असे, सिंधू अशोक साठे, सुनीता मधुकर काटे (महिला प्रतिनिधी) अशोक मंत्री, बाबासाहेब चितळे (व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी) पोपट कराळे (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी) पुरुषोत्तम इजारे (विमुक्त जाती-जमाती प्रतिनिधी) संतोष भागवत (अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी) असे निवडून आले आहेत. तर सहकारी सोसायटी मतदारसंघात, भगवान आव्हाड, गंगाधर गर्जे, कैलास देवढे, राम पठाडे, संदीप पठाडे, भीमराव पालवे, नवनाथ भवार, विठ्ठल मरकड, अण्णा वांदेकर, मच्छिंद्र सावंत या राजळे गटाच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले असून बाळू शिरसाठ यांना छत्री चिन्ह मिळाले आहे.

येत्या २८ जानेवारी रोजी मतदान होऊन मतमोजणी होईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक घडून आणणाऱ्या उमेदवाराचा बोलविता धनी कोण आहे याची खमंग चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगलेली पहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments