Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हासुपा औद्योगिक वसाहतीतील जाफा कंपनीमध्ये नवीन पशुखाद्य उत्पादन कारखान्याचे उद्घाटन

सुपा औद्योगिक वसाहतीतील जाफा कंपनीमध्ये नवीन पशुखाद्य उत्पादन कारखान्याचे उद्घाटन


Nagar Reporter
Online news Natwork
सुपा :
औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जाफा ही कंपनी कोंबडी खाद्य बनवत आहे याच कंपनीने पुढचे पाऊल टाकत आता पशुखाद्य उत्पादन सुरू केले आहे त्याचा उद्घाटन सोहळा नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ .नितीन कुरकुरे यांच्या हस्ते शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील एक हजार पेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. नितीन कुरकुरे यांनी जाफा कंपनीने पशुपक्ष्यांसाठी घेतलेल्या काळजीचे कौतुक केले तसेच अशा प्रकारचे खाद्य आपण आपल्या जनावरांना खाऊ घातल्यास नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे नमूद केले.


यानंतर चाफा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद वाघ यांनी भारतात जाफाच्या 28 वर्षांच्या उपलब्धतेची आणि कंपनीने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीची माहिती दिली.
यानंतर कंपनीचे खाद्य विभाग प्रमुख अमेय नाथ यांनी जफा नी आतापर्यंत पशुपक्षी आणि मत्स्य खाद्य कशाप्रकारे एका उच्च दर्जाचे बनवले आहे. आणि पुढील काळात खाद्यात होणाऱ्या क्रांतीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे पशुखाद्य विक्री प्रमुख हेमंत घोडके यांनी केले तसेच सर्व खाद्यपदार्थाची माहिती डॉ. मयुरी धुमाळ यांनी दिली. कार्यक्रमात पुढे कंपनीच्या सौ मीना पवार यांनी आतापर्यंत मिळालेल्या सर्व मानांकन आणि प्रमाणपत्रांची माहिती दिली.
आभार प्रदर्शन आप्पासाहेब काटे यांनी केल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दिलीप वाघमारे , आकाश आल्हाट, मनीष पाटील,नेमिनाथ सुतार, अजय शिंदे ,राजेंद्र बांगर ,अरुण मौर्य ,ज्ञानेश देशपांडे, रुचित राठोड, तेजस मगर, रामदास पाटील तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments