Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्रीक्षेत्र शक्तीपीठ मोहटादेवीगड येथे शांकभरी नवरात्र महोत्सव आरंभ

श्रीक्षेत्र शक्तीपीठ मोहटादेवीगड येथे शांकभरी नवरात्र महोत्सव आरंभ

Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी :
सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे शांकभरी नवरात्र महोत्सव आरंभ देवस्थानचे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, विठ्ठल कुटे, श्रीमती अनुराधा केदार यांच्या हस्ते महापूजा करुन आरंभ करण्यात आला.

शांकभरी नवरात्र उत्सवामध्ये शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडीयाग हवन, चौसष्ठ योगिनी दशमहाविद्या, अष्टभैरव इ. देवदेवतांसह, अभिषेकासह षोडशोपचार विधीयुक्त पुजा संपन्न ह होईल.
सकल भारतवासीय देवीभक्तांचे उत्तम आरोग्य व धनधान्य, सुख समृध्दी प्राप्त व्हावी, असा महासंकल्प करुन प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमास देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, देवस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ व भाविक मोठया संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पौरोहित्य पुजारी वे. श्री. भुषणदेवा, वे. भास्कर देशपांडे, विकास क्षीरसागर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments