Thursday, May 9, 2024
Homeक्राईमट्रक चालकास लुटून मारहाण करणा-या आरोपींना पकडले ; भिंगार पोलिसांची कारवाई

ट्रक चालकास लुटून मारहाण करणा-या आरोपींना पकडले ; भिंगार पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर
: ट्रक चालकास लुटून मारहाण करणा-या आरोपींना भिंगार कॅम्प पोलीसांनी १२ तासांच्या आत केले जेरबंद करण्याची कामगिरी केली आहे. फरहान फिरोज खान (वय २३, रा.हिनापार्क मुकुंदनगर अहमदनगर), भारत अशोक गायकवाड (रा दगडीचाळ मुकुंदनगर अहमदनगर) अशी नावे असून उर्वरित दोघे आरोपी हे अल्पवयीन आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोउपनि किरण साळुंके व तपास पथकातील पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, कैलास सोनार, संदिप घोडके, रामनाथ डोळे, दिपक शिंदे, रविंद्र टकले, संदिप थोरात, समिर शेख, कैलास शिरसाठ, अमोल आव्हाड यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ट्रक नं. (एमएच २० बी टी ३९१२) या मालट्रकमध्ये एव्हरेस्ट कंपनीचा माल सिमेंटचे शीट लखमापुर फाटा (जि.नाशिक) येथून भरुन तो अहमदनगर शहरामध्ये आल्यानंतर दि.११ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास नगर पुणे रोडने डीएसपी चौकाचे पुढे पाण्याचे टाकीजवळ आली असता ट्रकचे डाव्या बाजूने एक काळया रंगाची स्विफट कार ट्रकला आडवी लावून ट्रक थांबवली. ट्रकचे उजव्या बाजूने कारमधील दोघांनी खाली येऊन ट्रकचा दरवाजा उघडून ट्रकच्या आतमध्ये घुसून त्यातील एकजण उसको निचे लो, असे म्हणून त्यातील एकाने लाथाबुक्यांनी मारहाण करुन पॅटच्या पाठीमागील खिशातून २१ हजार ५०० रु रोख रक्कम ही बळजबरीने काढून घेऊन दुखापत केली, तेव्हा मी पण अहमदनगरचा आहे. असे सांगितले, असता तेवढयात खाली उभा असलेल्या दोघांपैकी एकाने नाकावर दगड मारुन जखमी केले. व इतर आरोपींनी दाबून धरुन लाथाबुक्यांनी पोटात मारहाण केल्याने नाकातून रक्त येत असल्याने आरोपी तेथून पळून गेले, या फिर्यादी बबलु विश्वनाथ जाधव (रा. दरेवाडी ता.जि अहमदनगर) यांच्या दवाखान्यातील जवाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला, यावरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान गुन्हयांचा तपास करतांना गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले त्यांचे फरहान फिरोज खान (रा हिना पार्क मुकुंदनगर अहमदनगर) भारत अशोक गायकवाड (रा दगडीचाळ मुकुंदनगर अहमदनगर) व दोघे आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंघाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रु किं.ची काळ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफट कार नं (एमएच ०२ एयु-५७७०) ही गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments