Thursday, May 9, 2024
Homeविशेष बातम्याश्रीराम नवरात्र;डॉ.आंबेडकर जयंती, निमा स्थापनादिन निमित्त पाथर्डीत आरोग्य तपासणी शिबिर.

श्रीराम नवरात्र;डॉ.आंबेडकर जयंती, निमा स्थापनादिन निमित्त पाथर्डीत आरोग्य तपासणी शिबिर.

श्रीराम नवरात्र,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व निमा संघटनेच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने पाथर्डीत आरोग्य तपासणी शिबिर.

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :
दैनंदिन कामात झोकुन देऊन नेहमी कार्यरत राहणारा महिला वर्ग कार्यबाहुल्यामुळे कुटुंबासाठीच जीवन जगत असतो.आपल्या स्वास्थ्याची पर्वाही न करता “आधी कुटूंब व मग मी” हीच त्यांची भावना असते.यासाठी श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान व श्री.धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटरच्या वतीने गरजू व विशेषतः महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.याचा सुमारे दिडशे रूग्णांनी लाभ घेतला.आरोग्य तपासणी डॉ.श्रीधर देशमुख, डॉ. सौ.ज्योती देशमुख यांनी केली.यावेळी आयर्न,कॅल्शियम व आहारपूरक औषधींचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री मंत्री,बाबासाहेब गर्जे व अमोल कांकरीया उपस्थित होते. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रणव देशमुख,वैशाली कुलकर्णी व रेवा देशमुख यांनी परीश्रम घेतले.
यावेळी सौ.कमल औटी,मंगल देशमुख,अलका तुंगार,लता गोरे,चंद्रकला दहिफळे,अश्विनी कुलकर्णी,मुक्ता खाडे,पठाण बेकरी वाले,हसीना,अफसाना शेख, अनिता सुरवसे,पुष्पा लगड आदि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments