Thursday, May 9, 2024
Homeक्राईमकोपरगाव तालुक्यात लाखोंचा गुटखा जप्त, तिघांना अटक ; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

कोपरगाव तालुक्यात लाखोंचा गुटखा जप्त, तिघांना अटक ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

कोपरगाव तालुक्यात लाखोंचा गुटखा जप्त, तिघांना अटक ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
Nagar Reporter
Online news Natwork
कोपरगाव :
तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणा-या तिघांना पकडण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे. चालक राजु उमराव भील (वय ३२, रा. वार्ड नं. ३ गवाडी, ता. निवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश), मितेश राजू भाबड (वय २८, रा. अंबिकापुरी, पाणीटाकीसमोर, इंदौर, मध्यप्रदेश), योगेश विजय कटाळे (वय ३४, रा. खडकी, वार्ड नं १ कोपरगांव ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहेत.
एसपी राकेश ओला, वैभव कलुबर्मे , शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, सचिन अडबल, संतोष खैरे, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, प्रशांत जाधव आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एलसीबी टिम’ने तात्काळ पुणतांबा फाटा (ता.कोपरगांव) येथे जाऊन सापळा रचून थांबले असता माहितीप्रमाणे पिकअप गाडी कोपरगांवचे दिशेने येतांना दिसली. गाडीचालकास गाडी रोडचे कडेला थांबवुन गाडीमध्ये असलेल्या दोघांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे चालक राजू उमराव भील, मितेश राजु भाबड असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांचे कब्जातील पिकअप गाडीची झडती घेता गाडीमध्ये ४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचा विमल पानमसाला, ४८ हजार ४०० रुपये किमतीची वि – १ सुगंधीत तंबाखू, ४ लाख ११ हजार ८४० रुपये किमतीचा राज निवास सुगंधीत पानमसाला, १ लाख ५ हजार ६०० रुपये किमतीची झेडएल -०१ जाफरानी सुगंधीत तंबाखू, ६ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी क्रमांक (एम.पी. ४६ जी.२३५७) असा एकूण १६ लाख १ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्यांनी गुटखा हा योगेश कटाळे (रा. कोपरगांव व किरण लामखडे रा. घारगांव, ता. संगमनेर) यांनी अभय गुप्ता (रा. छोटा बांगरदा रोड, इंदौर, मध्यप्रदेश) याच्याकडून खरेदी केलेला असून अभय गुप्ता याने गुटखा गाडीमध्ये भरुन पाठविला असल्याचे सांगितल्याने त्यांचेविरुध्द कोपरगांव शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २०४/२०२४ भादवि कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर गुन्ह्यातील फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीनुसार योगेश विजय कटाळे (वय ३४, रा. खडकी, वार्ड नं १ कोपरगांव ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास कोपरगांव शहर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments