Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकनवसाला पावणाऱ्या लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा

नवसाला पावणाऱ्या लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा

नवसाला पावणाऱ्या लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा
Nagar Reporter
Online news Natwork
शेवगाव
: सालाबादप्रमाणे शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील ग्रामदैवत लक्ष्मी माता यात्रौत्सव उत्साहात साजरा झाला.दि.२४ व २५ अशा दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात गावातील भाविकांनी गंगेचे पाणी आणून देवीला स्नान घातले,दि.२४ च्या सायंकाळी नऊ दिवस उपवास करणाऱ्या भाविकांच्या हस्ते बारागाडी ओढण्याचा सोहळा संपन्न झाला, तदनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, बारागाडी व फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याच रात्री गावातून छबीना मिरवणूक काढण्यात आली.


दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गावातील हनुमान मंदीरासमोर हजेऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला,चार वाजता लक्ष्मी माता मंदिर परिसरात कुस्त्यांचा हंगामा भरला होता,या हंगामासाठी नामवंत मल्लांनी हजेरी लावत, खेळातील आपले कौशल्य दाखवत कुस्ती प्रेमी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा यात्रोत्सव चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या व हनुमान जयंती च्या दुसऱ्या दिवसापासून साजरा केला जातो.
‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून लक्ष्मी देवीची ख्याती आहे, आपल्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी दूर करण्यासाठी लोक या देवीला साकडे घालतात आणि आपली इच्छापुर्ती झाली की यात्रेच्या वेळी नवस फेडतात.
लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सासरवासीनी दरवर्षी यात्रेसाठी माहेरी येतात, सुवासिनी जेवू घालतात व कौटुंबिक जीवन सुखा समाधानाचे जाण्यासाठी देवीचरणी प्रार्थना करतात.
या यात्रेतील बारागाडी ओढणाऱ्यावर भाविकांकडून रेवडी वर्षाव करण्याची प्रथा आहे, फेकलेल्या रेवड्या मधील एक तरी रेवडी मला मिळावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो,ही रेवडी म्हणजे लक्ष्मी देवीचा प्रसाद असल्याची ग्रामस्थांची श्रध्दा आहे.
या यात्रोत्सवासाठी यात्रा कमिटी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने श्री राजेंद्र पाटील भराट, काकासाहेब डोईफोडे, तुकाराम अभंग, तुकाराम घोरतळे, चंद्रकांत भराट, अशोक चंग, चंद्रकांत मातंग यांच्यासह गावचे सरपंच अरुण मातंग, उपसरपंच सौ.नंदाताई बर्गे, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा चेअरमन व सदस्य यात्रा नियोजना साठी परिश्रम घेत असतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments