Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमकायद्याचे उल्लंघन करणार नाही ; न्यायालयात लेखी, जुबेर शेख याला सोडले

कायद्याचे उल्लंघन करणार नाही ; न्यायालयात लेखी, जुबेर शेख याला सोडले

Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर –
देशासह राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईत भिंगार कॅम्प पोलीसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेशी संबंधित असणाऱ्या जुबेर अब्दुल सत्तार शेख (वय 38, रा. गोविंदपुरा,अहमदनगर) याला ताब्यात घेतले होते. जुबेर याला पोलिसांनी मंगळवारी (दि.२७) अहमदनगर न्यायालयात हजर केले असता, जुबेर याने कोणतेही दखल व अदखल पात्र गुन्हे करणार नाही, कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार नाही,असे लेखी न्यायालयासमोर दिल्याने त्याची न्यायालयाने सुटका केली आहे,अशी माहिती सरकारी वकील अनिकेत आव्हाड यांनी दिली.
देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेच्या कार्यकर्त्यावर कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एनआयए, ईडी, स्थानिक पोलीस यंत्रणेची छापेमारी चालू आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेच्या कार्यकत्यांवर झालेल्या छाप्याच्या विरोधात पीएफआय या संघटनेचे कार्यकर्ते यांनी पुणे, केरळ, उत्तर प्रदेश येथे हिंसक आंदोलन केल्याचे दिसून आले आहे. अहमदनगर भिंगार पोलीस ठाणे हद्दीत जुबेर अब्दुल सत्तार शेख हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया या संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता आहे. त्यांची व संघटनेची जिल्हयातील पार्श्वभूमी पाहता त्यांनी अहमदनगर जिल्हयामध्ये आंदोलन, निर्देशने यात गुन्हे दाखल आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीसांनी 03/2022 सी. आर. पी. सौ. 151 (3) प्रमाणे जुबेर अब्दुल सत्तार शेख याला ताब्यात घेतले होते.‌ यानंतर जुबेर याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याने दखल व अदखल पात्र गुन्हे करणार नाही, तसेच कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, अशी लेखी जुबेर याने दिल्याने त्याला न्यायालयाने सोडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments