Saturday, May 18, 2024
Homeविशेष बातम्याप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा धनादेश वितरीत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा धनादेश वितरीत.

भरणा केला ४३६ रुपये,आणि मिळाली दोन लाखांची मदत.
Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी :-
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी)येथील हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झालेले बाळू सूर्यभान बडे यांचा मुलगा अंबादास बडे याला आज ३ मे रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिंचपूर पांगुळ चे शाखाधिकारी राजीव कुमार यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.यावेळी बँकेचे कर्मचारी मनोज वणारसे ,कृष्णा गरड,बाबासाहेब उदमले,मुकुंद आघाव,सोमनाथ बडे उपस्तीत होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,काही दिवसांपूर्वी बाळू सूर्यभान बडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
बाळू बडे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिंचपूर पांगुळ शाखेत बचत खात्याच्या माध्यमातून स्वतःचा प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना विमा (वार्षिक ४३६रू.हप्ता ) भरणा केला होता.त्यामुळे विमेधारकाचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसास नुकसान भरपाई म्हणून दोन लाखाची मदत मिळते. बाळू बडे हे कुटुंबाचे एकमेव आधार होते .त्यामुळे कुटूंबाला मिळालेली हि मदत नक्कीच मोलाची ठरली आहे.चिंचपूर पांगुळ येथील शाखेच्या माध्यमातून नेहमीच खातेधारक साठी वेवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन व इतर सहाय्य केले जाते .त्यामुळे कार्यक्षेत्रातील ग्राहकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.बँकेच्या माध्यमातून नाममात्र हप्ता असणारे प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रत्येक व्यक्तीने काढले पाहिजेत.त्यासाठी पात्र खातेधारंकानी आमच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा शाखेत संपर्क साधावा ” असे आवाहन श्री राजीव कुमार शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिंचपूर
पांगुळ.यांनी केले आहे.
कायआहे? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जीवन ज्योती योजनेच्या (४३६रु.) माध्यमातून विमा संरक्षण घेतल्यास १८ते ५० वय असणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून वारसास २ लाख रुपये मिळतात.तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघात विमा योजना आहे. त्याची सुरुवात २०१५ साली झाली. सामान्यतः, जेव्हा कोणी अपघाती विमा घेतो तेव्हा त्याचे प्रीमियम शुल्क खूप जास्त असते. पण पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत वर्षाला फक्त ₹२० जमा करावे लागतात. या योजनेअंतर्गत, कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नामीत व्यक्तीला २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक रक्कम दिली जाते.तर गंभीर दुखापत किंवा अपंगत्व आल्यास, १००००० ची रक्कम प्रदान केली जाते.
दोन्ही ही विम्याचा कालावधी हा १ वर्षाचा आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. त्याचा वार्षिक प्रीमियम १ जूनपूर्वी खात्यातून कापला जातो.
याचा फायदा कोण घेऊ शकतो? गरीब आणि मागासवर्गीय लोकांना
डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विमा योजना सुरू केलेल्या होत्या. गरीब आणि मागासवर्गीय लोकांना कमी खर्चात विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. यासोबतच तो मागासवर्गीय किंवा गरीब वर्गातील असेल तरच यासाठी अर्ज करू शकतो.या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे. ज्या बँकेत ऑटो डेबिट सुविधा देखील सक्रिय आहे त्याच बँकेत खाते असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन फॉर्म भरून विमा संरक्षण लागू करता येतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments