Monday, May 20, 2024
Homeक्राईमयुवकाचा खून करणा-यांना २४ तासात अटक ; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी

युवकाचा खून करणा-यांना २४ तासात अटक ; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
युवकाचा खून करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे. बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे (वय २२, रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता जि अहमदनगर), रोहीत प्रकाश पाटोळे (वय २१, रा. रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, पोसई दिपक पाठक, पोहेकॉ पोहेकॉ नंदकुमार सांगळे, पोहेकों नितीन उगलमुगले, पोहेकॉ साबीर शेख, पोहेकॉ चव्हाण पोहेकॉ राजु सुद्रिक, पोना महेश बोरुडे, पोका. किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, पोकों सचिन हरदास, पोकॉ शेरकर पोकॉ राठोड तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकॉ राहुल गुंडु यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १५ जानेवारी २०२४ रोजी फिर्यादी अनिकेत अशोक सोनवणे ( रा. फोजिंग कॉलनी शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवार अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की, दि. १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान माझा भाऊ शुभम सोनवणे यास बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व त्याचा भाऊ रोहीत प्रकाश पाटोळे यांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन हातातील धारधार शस्त्राने शुभम याचे छातीत पोटात वार करुन त्यास जिवंत ठार मारले आहे. वैगरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर ३९/२०२४ भादवि कलम ३०२,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे, रोहीत प्रकाश पाटोळे हे गुन्हा करुन राहुरी कडे पळून गेले आहेत. त्यावरुन एमआयडीसी पोलीसांचे पथक तयार करुन आरोपींना राहुरी येथे सापळा लावून पकडले. त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे ( रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि अहमदनगर), रोहीत प्रकाश पाटोळे (वय २१, रा. रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि अहमदनगर) अशी सांगितली. त्यांना गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की, आम्हास मयत शुभम अशोक सोनवणे यांने शिवीगाळ केली होती. त्याचा मनात राग धरुन आम्ही त्यास जिवंत ठार मारले आहे.
आरोपी बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी अहमदनगर पोस्टे गु रजि नंबर ३९/२०२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे. तोफखाना पोस्टे गु रजि नंबर ४८५/२०२२ भादवि कलम ३२४,३३७,५०४,५०६ प्रमाणे अशी गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments