Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedमोहटागडावर वासंतिक नवरात्र उत्सवाची गुढीपाडव्यापासून सुरवात...!

मोहटागडावर वासंतिक नवरात्र उत्सवाची गुढीपाडव्यापासून सुरवात…!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी:
श्री क्षेत्र जगदंबा (मोहटादेवी) गडावर मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ गुढीपाडवा पासून देवीचा वासंतिक (चैत्र) नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश-१ श्री निरंजन नाईकवाडे व देवस्थानचे इतर विश्वस्त यांचे शुभहस्ते सकाळी सहा वाजता श्री मोहटादेवीस महाभिषेक, शांतीपाठ, पुण्याहवाचन होऊन सप्तशती पाठांची वरणी दिल्यानंतर,गुढी उभारून गुढीचे पूजन, त्यानंतर महाआरती संपन्न होणार आहे.

वासंतिक नवरात्र कालावधीत दररोज सप्तशती पाठांचे वाचन होणार असून सांगता श्रीराम नवमी, बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी होमहवन पूर्णाहुतीने संपन्न होणार आहे. अशी माहिती
जगदंबा देवस्थान (मोहटादेवी) सार्वजनिक ट्रस्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली आहे.तरी भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments