Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकचिंचपूर पागुंळ;मलिक यात्रेची तयारी पूर्ण...!

चिंचपूर पागुंळ;मलिक यात्रेची तयारी पूर्ण…!

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे,पाथर्डी:-
तालुक्यातील पूर्वभागातील चिंचपूर पांगुळ ग्रामदैवत मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या यात्रोत्सव बुधवारी (दि.१०)रोजी देवाला नारळ फोडून सुरवात करण्यात आली.यावेळी दादासाहेब बारगजे,आश्रुबा बडे,नामदेवराव बडे, विष्णू खडे, बाबासाहेब खाडे, पोपट बडे,गहिनाथ बडे, शहादेव खाडे, आनंद रंधवे,पोपट दशरथ बडे,गौतम बडे(मु.पो.),गोविंद बडे(विक्रीकर निरीक्षक) ,रघुनाथ बडे,नितीन बारगजे,उध्दव केदार,गणपत बडे,विक्रम साखरे,दादा राजगुरू,बाबासाहेब राजगुरू,सतीश साळवे,राजेंद्र बडे,नामदेव बडे,आजीनाथ बडे,रोहिदास बडे,मारोती खाडे,आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या परिसरात हा सर्वात मोठा होणारा सार्वजनिक उस्तव असल्याने मलीक यात्रा उस्तव समितीने या यात्रेकरिता मोठी तयारी केली आहे.                 यात्रा महोत्सवसाठी भाविक,ग्रामस्थ तसेच बाहेरगावी नोकरी,कामधंद्यांसाठी गेलेले चाकरमानी यांना वर्षभर यात्रेची ओढ लागलेली असते.यात्राच्या निमित्ताने वर्षभर बाहेर असलेले गावकरी यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात.श्रीक्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात येणार आहे.

त्यानंतर शुक्रवारी दि.१२ रोजी देवाच्या प्रतिमेची ,घोडा मिरवणूक,छबिना काढण्यात येणार असून,त्यांनंतर बारामती येथील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा,चे रात्री हिंदी आणि मराठी गाण्याचा तसेच नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर शनिवार (दि.१३)रोजी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात येणार आहे.या कुस्त्यासाठी नामवंत मल्ल हजेरी लावनार असून नवसाच्या तसेच मानाच्या कुस्त्या लावल्या जाणार आहेत.यावर्षी प्रथमच भव्य दिव्य असे कुस्त्यांचे सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी,बीड,उस्मानाबाद,पुणे,बारामती,सोलापूर,तसेच बाहेरील राज्यतूनही पहिलवान हजेरी लावनार आहेत.त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने महिला पहिलवान देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती यात्रा समितीने दिली आहे.यात्रा समिती तसेच गावकऱ्यांच्या वतीने विजयी मल्लांना भरघोस इनामाने गौरविण्यात येणार आहे. गावातील तसेच परिसरातील मुबंई, पुणे तसेच इतर ठिकाणी असलेले चाकरमानी आवर्जून यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते.चिंचपूर पांगुळ व परिसरातील सर्वभाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहभागी व्हावे व यात्रोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments