Thursday, May 9, 2024
Homeविशेष बातम्यामकर संक्रांती निमित्त पाथर्डीत महिला बचतगटांचा आनंद मेळावाः अभिनेत्री अनिता दाते यांची...

मकर संक्रांती निमित्त पाथर्डीत महिला बचतगटांचा आनंद मेळावाः अभिनेत्री अनिता दाते यांची उपस्थिती.

मकर संक्रांती निमित्त पाथर्डीत महिला बचतगटांचा आनंद मेळावाः अभिनेत्री अनिता दाते यांची उपस्थिती….

Nagar Reporter
Online news Natwork

सोमराज बडे पाथर्डीःमकर संक्रांत निमित्त येत्या शुक्रवार दि.१२ जानेवारी व शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी पाथर्डीतील संस्कार भवन येथे शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील महिला बचत गटांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला असून, समारोपासाठी मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे यांनी दिली.

बचत गटांतील महिलांच्या कत्वृत्वाचा सन्मान करण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील शेकडो महिला बचत गटातील कर्तृत्वान महिला भगिनी सहभागी असणार आहेत. या दोन दिवसीय मेळाव्यात खाद्य पदार्थ, साहीत्य प्रदर्शन विक्री व विविध महिलांच्या अनुषांगीक खेळ प्रकार आयोजित असणार आहेत शनिवार दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.वा. माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.ज्यात संक्रांत वाण वाटप, हळदी कुंकू असा कार्यक्रम असणार आहे.
शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी 11.00वा. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पाथर्डीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, डॉ.जदिश पालवे, श्रीमती शशिकला गांधी, श्रीमती साखरबाई बोरूडे, श्रीमती चंद्रकला ज्ञानदेव खेडकर, श्रीमती शंकुतला छाजेड, सौ.शोभाताई मुरलिधर दहिफळे, सौ.निशा प्रसादराव मते, सौ.रूचा शाम वाडकर, सौ. कविता संतोष मुटकूळे, सौ.प्रेरणा सुधीर शिंदे, व सौ.अंजली विनायक आहेरआदी उपस्थित राहणार असून मतदार संघातील महिलांनी या आनंद मेळाव्यास उपस्तीत रहावे असे आवाहन सौ. ढाकणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments