Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्रीवामनभाऊ विद्यालयात युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी...

श्रीवामनभाऊ विद्यालयात युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी…

Nagar Reporter
Online news Natwork

पाथर्डी: स्वामी विवेकानंद जयंती, म्हणजेच युवा दिन शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांसह स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम राबवत उत्साहात साजरा केला. यानिमित्त विवेकानंदाच्या विचारावर आधारित व्याख्यान, स्पर्धा घेण्यात आल्या.एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयामध्ये युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस व राजमाता जिजाऊ यांची जंयती निमित्त मुख्याध्यापक संजय नरोडे,पत्रकार सोमराज बडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यालय प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील ,डॉ.संजय उदमलेसर,ढाकणे सर घुलेसर, दहिफळेसर, मर्दानेसर, कुदळसर, ,जाधवसर, बाबासाहेब राजगुरू, आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श विचारांची युवा पिढीला गरज असल्याच्या भावना सोमराज बडे यांनी बोलतांना व्यक्त केल्या.
, ‘युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातूनच शक्य आहे. युवकांनी रुढी, परंपरा झुगारून सक्षम भारत घडविण्यासाठी सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे,’ असे आवाहन मुख्याध्यापक संजय नरोडे यांनी केले. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,बडे हनुमंत व प्रास्तविक अथर्व बडे याने तर आभार प्रदर्शन बडे सचिन या विद्यार्थ्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments