Thursday, May 9, 2024
Homeअहमदनगर जिल्हाॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पाथर्डी - शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

ॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

पत्रकारिता जिवंत ठेवायची असेल तर, माध्यमांची चिकित्सा होणे ही,.आज काळाची गरज आहे : पत्रकार सुधीर लंके
ॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान.

Nagar Reporter
Online news Natwork (video)

सोमराज बडे
पाथर्डी
: पत्रकारांमध्ये जर पत्रकारिता जिवंत ठेवायची असेल, तर आज माध्यमांची चिकित्सा करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दै.लोकमत अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी केले.ॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील पत्रकारांच्या आयोजित सत्कार समारंभ व‌ संघर्षयोध्दा कै.स्व.बबनरावजी ढाकणे साहेब यांच्या जीवनपट दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी
ते प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा शेवंगाव-पाथर्डी मतदार संघाचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे हे होते.
श्री सुधीर लंके पुढे म्हणाले की, पत्रकारांचा सत्कार करण्यापेक्षा जो प्रिंट मिडियामध्ये उत्तम,निर्भीड, निःपक्ष काम करेल, डेव्हलपमेंटसाठीच्या पत्रकारितेसाठी व जो समाजाच्या मुलभूत प्रश्नांना हात घालून आवाज उठवत आहे, अशा पोर्टलसाठी सुद्धा पुरस्कार देण्याची गरज आता आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा आपण चौथा स्तंभ म्हणतो, उर्वरित तीन स्तंभ आहेत. ज्या कायदे मंडळात कायदे बनतात. संसद, विधानसभा कार्यकारी मंडळ आहे. जे कायद्याची अंमलबजावणी करते. न्यायपालिका आहे.‌ कायदे आपल्या घटनेनुसार बनत आहे का? आणि कायद्याचे पालन कायद्यानुसार तंतोतंत होत खरोखर आहे का? यांची शहानिशा न्यायपालिका पाहते, आणि माध्यम ही या तिन्ही स्तंभाची चिकित्सा करते. कायदेमंडळ निट वागते का? या लोकशाहीतील तिन्ही स्तंभाची चिकित्सा माध्यम करतात. पण आपण पत्रकार म्हणून नीट वागत आहोत का? यांची चिकित्सा समाजाला करण्याची परवानगी आहे? याबाबत चर्चा झाली पाहिजे. पत्रकारिता हा आजच्या घडीला व्यवसाय बनला आहे, परंतु हे एक पूर्वी मिशन होते. असे ते बोलतांना म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि शेवगाव-पाथर्डी तालुक्याचे नेते ॲड.प्रताप (काका )ढाकणे म्हणाले की, राजकारणाच्या तु-तू, मैं-मैं पेक्षा दुर्लक्षित ,उपेक्षित ,दिन-दुबळ्या समजाकडे व त्याच्या सामाजिक समस्या,आणि विकासावरील गोष्टीवर लिखाण करून राजकीय पुढाऱ्यांना जाग आणण्याचे काम केले पाहिजे.
संघर्षयोध्दा कै.स्व.बबनरावजी ढाकणे साहेब साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, उमेश मोरगांवकर,‌ कैलास बुधवंत आदिंची याप्रसंगी परखड अशी भाषणे झाली.
यावेळी नुकतीच निवड झालेले स्नेहालय संस्थेचे विश्वस्त संजय मेहेरकर व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नागनाथ गर्जे, महाराष्ट्र टिचर्स असो‌‌.तर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजीराव मरकड, सरपंच संघटनेच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरदराव सोनवणे आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.सभापती गहिनीनाथ शिरसाट, , मा.प.स.सदस्य डॉ.राजेंद्र खेडकर, भाऊसाहेब धस, दिगंबर गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, शहराध्यक्ष देव पवार, साहित्यिक हुमाहुमभाई आतार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सविताताई भापकर, मा.नगराध्यक्षा रत्नमालाताई उदमले, शिवसेनेचे भगवान दराडे, किसनराव आव्हाड, बंडू पा.बोरुडे, महारुद्र किर्तने, आदिंसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments