Saturday, April 27, 2024
Homeक्राईमबसलूट प्रकरणातील ९ वर्षापासून फरारीस आरोपीस पकडले; नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

बसलूट प्रकरणातील ९ वर्षापासून फरारीस आरोपीस पकडले; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
शिर्डी लक्झरी बस लूट प्रकरणातील
९ वर्षापासून फरार असणारा आरोपी पकडण्यात नगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. मच्छिंद्र पोपट कांडेकररा (केडगांव, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला व श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी मा.श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सफौ राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२८-०४-२०१५ रोजी अहमदनगर येथून लक्झरी बसणे सुरत, गुजरात येथे जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदीरासमोर २ अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करुन तुम्ही चोरी करुन आले. पोलीस स्टेशनला चला असे म्हणून लक्झरी बसमधून खाली उतरवून तवेरा गाडीत बसवले. जवळील ५ लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन गेले. कोपरगांव येथे सोडून निघून गेले, या रमेशभाई भाईचंद पटेल (रा. नवाधर कोसा, ता. विसनगर, जि. मेहसाना, गुजरात हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात.गु.र.नं. १३८/२०१५ भादविक ३९५,३६३, १७०,३४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे तपासात तात्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरु (सर्व रा. केडगांव, अहमदनगर), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), फरारी आरोपी मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव, ता. नगर) व नितीन पटेल (रा. कोर्ट गल्ली, अहमदनगर) असे आरोपी निष्पन्न करुन आरोपी राजेंद्र मोहन फडतरे, पंकज तान्हाजी गडाख, नितीन पटेल यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकिस आणला होता. परंतु आरोपी मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता.
एसपी राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास आवश्यक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार एलसीबी टिम’ने गुन्ह्यातील फरार आरोपी मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव, अहमदनगर) याची माहिती काढत असताना तो गोंदीया, नागपुर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून, ओळख लपवून राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. आरोपी दि.२८ मार्च २०२४ रोजी कात्रड, वांबोरी ( ता. राहुरी) येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबी टिम’ने लागलीच कात्रड, वांबोरी( ता. राहुरी) येथे जाऊन फरार आरोपीचे नातेवाईकाचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन नातेवाईकांचे घराचे आजुबाजूला सापळा रचून थांबलेले असताना ठिकाणी एकजण तोंड बांधलेला संशयीतरित्या घरामध्ये गेल्याचे दिसून आल्याने एलसीबी टिम’ने तात्काळ ठिकाणी जाऊन संशयीतास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. एकनाथ नगर, केडगांव, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपीने सन 2015 मध्ये रमेश भाईचंद पटेल हे हवालाची 5 लाख रुपये रोख रक्कम अहमदनगर येथुन लक्झरी बसणे सुरत, गुजरात येथे जाणार असल्याने त्यांचे लक्झरी बसचा अहमदनगर येथुन तवेरा गाडीतुन पाठलाग करुन त्यांना शिर्डीत लुटल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments