Saturday, April 27, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकशिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
शिवसेनेच्या ( शिंदे गट)वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली जीवंत देखावा सर्वांचे आकर्षणठरला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील, ओंकार सातपुते सह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.


सालाबादप्रमाणे या ही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती नगर शहर शिवसेने तर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली हया मिरवणुक सोहळयामध्ये पारंपारीक वादय, ढोलपथक, बँड पथक, घोडे मावळे,सनई चौघडे, फटाक्यांची आतीषबाजी व ध्वनीक्षेपक , चित्ररथ यांचा समावेश असतो.
नगर शहरात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली भगवे झेंडे, शिवाजी महाराजांचे पोवाडे तसेच जय भवानी जय शिवाजी घोषणांनी नगर शहर दणाणून गेले होते सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आठ मंडळे सहभागी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments