Thursday, May 9, 2024
Homeराजकीयनगर दक्षिणेत भुजबळांचा आदेश सर्वोतोपरी ; जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेते भुजबळांच्या भेटीला

नगर दक्षिणेत भुजबळांचा आदेश सर्वोतोपरी ; जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेते भुजबळांच्या भेटीला

नगर दक्षिणेत भुजबळांचा आदेश सर्वोतोपरी ; जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेते भुजबळांच्या भेटीला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर :-
लोकसभा निवडणूक घोषीत झाल्यापासून नगर जिल्हा राजकीय घडामोडींनी ढवळून निघाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही प्रमुख उमेदवारांची घोषणा झाली आहे. महायुती विरुध्द महाविकासआघाडी आशी सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यानी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म, नाशिक येथे भेट घेतली.

नुकतीच फेब्रुवारी महिन्यात नगर शहरामध्ये ओबीसी, भटके विमुक्त महायल्गार सभा पार पडली होती. या सभेने जिल्ह्यातील गर्दीचा विक्रम केला होता. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बाहुल्य मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार यामध्ये यामध्ये ओबीसी समाज निर्नायक मानला जातो. माळी , धनगर , वंजारी या जातींचा प्रमुख प्रभाव आहे. नगर दक्षिण मतदारसंघमध्ये ओबीसी ,भटकेविमुक्त समाजाची संख्या ८ लाखाच्या आसपास आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यानी कडाडून विरोध केला होता. यातून छगन भुजबळ याना नगर दक्षिणमधील ओबीसी समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळला होता. भुजबळ यानी ओबीसी समाजासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे भुजबळ यांच्याविषयी ओबीसी समाजात सहनुभूतीची लाट आहे. नगर दक्षिणमधील आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची भूमिका काय असावी, यासाठी नगर जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यानी भुजबळ यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. मंत्री भुजबळ जो आदेश देतील, त्या आदेशाला सर्वोच्च समजून जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेते आणि कार्यकर्ते काम करतिल अशी माहिती काही ओबीसी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी समता परिषदेचे विभाग प्रमुख अंबादास गारुडकर, पारनेर पंचायत समितीचे मा.सभापती खंडूजी भुकन , पारनेर बाजार समिती संचालक किसन रासकर , भारतीय जनता मोर्चा ओबीसी उपाध्यक्ष श्री सुधाकर आव्हाड , माजी प्रशासकिय अधिकारी दिलीप खेडकर, पाथर्डीचे नगरसेवक रमेश गोरे , श्रीगोंदा तालुक्यातील सरपंच विजय शेंडे, नाभिक समाजाचे ओबीसी नेते अनिल निकम ,नाथशेठ रासकर, प्रसाद खामकर ,ज्ञानेश्वर खराडे सर , दिपक खांदे, स्वप्नील झगडे, देविदास शिंदे, अरुण देडगे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments