Wednesday, May 1, 2024
Homeक्राईमपाथर्डी तालुक्यात ५४० जणांवर कारवाई ; १६ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल

पाथर्डी तालुक्यात ५४० जणांवर कारवाई ; १६ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल

पाथर्डी तालुक्यात ५४० जणांवर कारवाई ; ३१ दारुविक्रेत्यांविरुद्ध तर १६ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल
Nagar Reporter
Online news Natwork
पाथर्डी : तालुक्यातील वाढती गुन्हेगारी व सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ५४० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली तर ४९० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ३१ दारुविक्रेत्यांविरुद्ध कारवाई झाली आहे. १६ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्याशेजारील काही तालुक्यांतून हद्दपार केले आहे. तीन टोळ्यांतील १३ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. १८ जुगार अड्डयांवर छापे मारून २ लाख २२ हजार २०५ रुपये जप्त केले आहेत. ८६ अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध कारवाई करुन ५ लाख २३ हजार २४० रुपयांचा माल जप्त केला असल्याची माहिती पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे.
📥📥📥📥
गुन्हेगारांविरुध्द कडक मोहीम राबविल्याने शहर व तालुक्यातील वातावरण अतिशय शांत झाले आहे. चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन रात्रीची गस्त व गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे काम सुरु आहे. चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यापैकी काही गुन्हेगार हाती लागण्याची शक्यता आहे. सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

📥📥📥📥

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगार, अवैध व्यावसायिक, सामाजिक शांततेचा भंग करणारे लोक, गंभीर गुन्हे करणारे इसम, जुगार अड्डे अशा विविध लोकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. २९० लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली असून, ११७ जणांना तहसीलदारांसमोर नेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. ३१ दारुविक्रेत्यांना अटक करण्यात आली. तीन टोळ्यांतील १३ जणाविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्याकडे दाखल केले आहेत. प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी त्यापैकी दोघांना हद्दपारीचे आदेश दिले आहेत. किशोर बन्सी जायभाये. (रा. येळी, ता. पाथर्डी) याला दोन वर्षांसाठी अहमदनगर – जिल्हा व बीडच्या आष्टी व शिरुर दोन तालुक्यांतून हद्दपार केले आहे. काटेवाडी येथील नवनाथ उगलमोगले यास अहमदनगर जिल्हा, नाशिकचा येवला तालका संभाजीनगरचा गंगापर – वैजापुर व पैठण तर बीडचा शिरुर व आष्टी दोन तालुक्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. हद्दपारीचे आणखी चौदा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत असून, मंजुरी मिळताच संबधितांवार कारवाई केली जाईल. तालुक्यातील सर्व परवानाधारक शत्र जमा करून घेण्यात आले आहेत. समन्स बजावण्यात ९१ टक्के, वॉरंट बजावण्यात ८० टक्के काम झालेले आहे. दोन तलवारी बाळगणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. निवडणुकीत कोणताही दबाव, षडयंत्र व अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस काम करीत आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क निर्भय वातावरणात पार पाडावा, असे आवाहन पोनि श्री मुटकुळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments