Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशफुटबॉल स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, चेंगराचेंगरीत 12जणांचा मृत्यू

फुटबॉल स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, चेंगराचेंगरीत 12जणांचा मृत्यू

सॅन साल्वाडोर : एल साल्वाडोरमध्ये (El Salvador) शनिवारी फुटबॉल सामना (football match) पाहण्यासाठी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) 12 जण ठार आणि 100हून अधिक जखमी झाले. तथापि, येथून सुमारे 500 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सामना सुरू होण्याआधी एंट्री गेट बंद केल्यानंतर अनेक लोकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही घटना घडली. या दुर्घटनेसंदर्भातील फुटेज जारी करण्यात आले असून, त्यात अनेक लोक प्रवेशद्वारालगतची बॅरिकेड्स हटवताना दिसत आहेत. सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी ही घटना घडली. परिणामी त्यापुढचे खेळ रद्द करण्यात आला. कस्कटलान स्टेडियमवर (Cuscatlan Stadium) शनिवारी हा सामना अलियान्झा एफसी आणि क्लब डेपोर्टिवो एफएएस यांच्यात सुरू होता. हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. त्याची क्षमता 44 हजारांहून जास्त आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खेळ थांबवण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments