Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकराज्य सरकारकडून मोठा निर्णय, दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

राज्य सरकारकडून मोठा निर्णय, दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

पुणे : देशातील अनेक गणेशभक्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणेशभक्तांसाठी आणि खास करून पुण्यातील गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दगडूशेठ गणपती मंदिराला (Dagdusheth Ganapati Temple) आता पर्याटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

पुण्यातील दगडूशेठ मंदिर अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशभरातील गणेशभक्त एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी दगडूशेठ गणपती मंदिराला पर्याटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दगडूशेठ हलवाई मंदिर यापुढे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. याशिवाय चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत दिले आहे. शुक्रवारी (19 मे) पुणे जिल्हा नियोजन बैठक पार पडली, यावेळी इतर निर्णयही घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments