Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाजामखेडमध्ये कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

जामखेडमध्ये कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

रोहित राजगुरू
Nagar Reporter
Online News Natwork
जामखेड –
जामखेड शहराच्या हद्दीतील नशेची व अवैध धंद्यांची ठिकाण असलेल्या कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंद करून कलाकेंद्र बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या बाबत तहसील कार्यालयाला दिगंबर उत्तम आजबे, सचिन दत्तात्रय आजबे, सतिश वसंत राजगुरू, चंद्रकांत दत्तात्रय राऊत, गणेश उत्तमराव आजबे, सुनिता दत्तात्रय आजबे, राणी संजय ढेपे, सूवर्णा दिगंबर आजबे, किरण कृष्णा आजबे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की मराठवाड्यासह पाच जिल्हय़ाच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेडचे नाव शैक्षणिक, समाजिक व व्यापारी दृष्टीने राज्यात मोठे आहे. रेमन मँगासेस पूरस्कार विजेते डॉ रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीमुळे जामखेडचे नाव आदराने घेतले जाते. एके काळी कला केंद्र उपजिविकेची साधनं होती. मात्र सध्या कलेच्या नावाखाली राजरोस अवैद्य व्यवसाय करणारया राज्य महामार्गावरील झंकार संगीत केंद्र, जगदंबा कला केंद्र, लक्ष्मी कला केंद्र या ठिकाणी सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. शेजारच्या नागरिकांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचत आहे. या कलाकेंद्रामुळे शेजारच्या गावात कोणी मूली देत नाहीत. अनेक लोकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. कला केंद्रांमध्ये येणाऱ्या लोकांना नशा करण्यास प्रवृत्त केले जाते व सर्व प्रकारच्या नशेची सर्व वस्तू या ठिकाणी मिळतात. नशेनंतर त्या लोकांची लूटमार केली जाते. राज्यातील पर राज्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचा वावर याठिकाणी मोठा आहे. हे लोक गुन्हा करून या कला केंद्रात आश्रय घेतात. सदर कला केंद्र राजरोस दरोडा टाकण्याची केंद्र झालेले आहे. सर्व नियमांची पायमल्ली करत कला केंद्र पहाटे ४ वाजे वाजेपर्यंत चालू राहतात. तसेच नशेच्या अमलाखाली असलेल्या या व्यक्ती कर्ण कर्कस आवाजात मोठ्याने आरडाओरडा करतात. स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होतो आणि नागरिकांबरोबर अनेकवेळा गंभीर भांडणेही झालेली आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली व महिला कलाकेंद्रात आणण्यासाठी कलाकेंद्र पुरस्कृत टोळ्या आहेत. मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments