Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रअहमदनगर-भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यपदी पाचव्यांद वसंतराव राठोड यांची नियुक्ती

अहमदनगर-भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यपदी पाचव्यांद वसंतराव राठोड यांची नियुक्ती

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाने देशातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यांच्या नुकत्याच फेरनिवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यपदी भाजपा भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांची पाचव्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली आहे. रक्षा मंत्रालयाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत श्री राठोड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

अहमदनगर -भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची गेल्या ३ ते ४ टर्मपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नाही. परंतु केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्य पद हे केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाने राजपत्र भाग-११ खंड ४ मध्ये ३ ऑगस्ट २०२३ च्या अधिसूचनेत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यांच्या फेरफार बदल करण्याच्या घोषणेनुसार‌ कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिनियम २००६( २००६ क ४१ ) कलम १३ कलमान्वये उप-कलम (३) नुसार दि.११ ऑगस्ट २०२३ पासून नव्याने मानद सदस्यांच्या फेरनिवडी रक्षा मंत्रालयाने करून त्या राजपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत.

अहमदनगर – भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंत राठोड यांनी भिंगार शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठीचा बोर्ड प्रशासनाकडे प्रशासकीय पाठपुरावा केला. यात देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डापैकी प्रामुख्याने एकमेव भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिक वाढीव जास्त दराने पाणी विकत घेत होते. हा भिंगार नागरिकांवर पडत असणार वाढीव पाणीपट्टीचा बोजा कमी करण्यासाठी बोर्डाचे मानद सदस्य वसंत राठोड यांनी खा.डाॅ.सुजय विखे पा. यांच्या माध्यमातून रक्षा मंत्रालयाकडे पाठपुरावा केला, त्याला यश आले. तसेच घराच्या बांधकाम परवानगीबाबत येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीही कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे श्री राठोड यांनी पाठपुरावा केला. तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील मालमत्ता हस्तांतरित किचकट प्रशासकीय प्रक्रियेला श्री राठोड यांनी विरोध करुन ती सुधारण्यासाठी बोर्ड प्रशासनाकडे पाठपुरावा केला.यामुळेच या सर्व कामांची पावती म्हणूनच रक्षा मंत्रालयाने वसंतराव राठोड यांची पाचव्यांदा भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यपदी फेरनिवड केली आहे. या निवडीमुळे खा.डाॅ.सुजय विखे पा., पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, भैय्या गंधे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी श्री राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments