Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमफरार आरोपी अखेर जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई

फरार आरोपी अखेर जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: जबरी चोरीतील फरार आरोपीस भिंगार कॅम्प पोलीसांनी अटक केली आहे. फरदिन खलील शेख (वय २१, रा. मुलानगल्ली, भिंगार, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु, पोसई मनोज महाजन, तपास पथकातील पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, समीर शेख, अमोल आव्हाड, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, कांतीलाल चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ते त्यांचे दुचाकीवरुन विजयलाईन चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असतांना डी ओ मोपेड गाडीवरील तीन अज्ञातांनी बळजबरीने सँगमधील २० हजार रु किंमतीचा मोबाईल फोन हा बळजबरीने घेऊन गेले आहेत, या रामेश्न सुधाकर ढवळे ( रा वडगांव बुद्रुक जि पुणे) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गुरंनं ८०९/२०२३ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा केल्यापासुन आरोपी फरार होते.
सपोनि योगेश राजगुरु यांना माहीती मिळाली. त्यानुसार भिंगार पोलिसांनी आरोपीच्या घराजवळ सापळा लावुन थांबलेले असतांना पोलीसांची त्यास चाहुल लागताच तो पळून जात असतांना पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफिने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव फरदिन खलील शेख ( मुलानगल्ली, भिंगार, अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन पुन्हा चौकशी करता त्याने गुन्हा केल्यांचे कबुल केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई मनोज महाजन हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments