Thursday, May 9, 2024
Homeक्राईमपरराज्य सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली : ४ जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस ; राहुरी...

परराज्य सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली : ४ जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस ; राहुरी पोलिसांची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
दरोड्याच्या तयारीत असणारी परराज्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी पकडली आहे. या टोळीकडून १ लाख ३ हजार ५० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्याना पोलिस खाक्या दाखविताचा‌ संभाजीनगर शहर, सोलापूर, पुणे व अहमदनगर येथे केलेली ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या पकडण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी एकूण ३४ गुन्हे बिहार राज्यात व दिल्ली येथे दाखल आहेत. राहुल कुमार गुलाबचंद यादव (वय २३), सिंटु कुमार रामसिंग यादव (वय २९ , राज्य बिहार पोलीस ठाणे, कोडा, अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव, चंदन कुमार गुल्ला यादव (सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस ठाणे, कोडा) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस ठाण्याचे पो.नि.संजय आर.ठेंगे यांच्या सूचनेनुसार सपोनि देवेंद्र शिंदे, पोहेकॉ.सुरज गायकवाड, पोहेकॉ.राहुल यादव, पोहेकॉ.विकास साळवे, पोहेकॉ. पाखरे, पोना.प्रविण आहिरे, गोपनीय शिंदे , पोना.प्रविण बागुल, पोकॉ.प्रमोद ढाकणे, पोकॉ.नदिम शेख, पोकॉ. अंकुश भोसले, पोकॉ.सतिष कुऱ्हाडे , पोकॉ.सचिन ताजणे, पोकॉ.गोवर्धन कदम आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.७ मार्च २०२४ पोनि संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की, राहुरी येथे बँकेचे कॅश पार्टीवर पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीने बिहार राज्यातील ६ आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे. या माहितीआधारे नगर ते मनमाड जाणारे रोडवरील, राहुरी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया राहुरी शाखेसमोर रोडवर दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकुन दरोडयाचे तयारीत असणारे आरोपी राहुल कुमार गुलाबचंद यादव, सिंटु कुमार रामसिंग यादव, अजित ऊर्फ गौतम गुरुददीन यादव, चंदन कुमार गुल्ला यादव (सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस ठाणे कोडा) यांना एकूण १ लाख ३ हजार ५० रुपये किंमतीचे लोखंडी टॉमी,सुरा, दोरी, लाल मिर्च पावडर, बॅटरी, कत्ती, हेल्मेट, कापडी पिवशी, सिमकार्ड, सॅग, शर्ट, पॅन्ट, नंबर प्लेट, क्रु डायव्हर, पान्हा , २ चोरीच्या दुचाकी (किंमत १ लाख रुपय) अशा मुद्देमालासह दरोडा टाकण्याचे उददेशाने एकत्र जमवून पूर्व तयारी करुन घातक शस्त्रांसह मिळून आले आहेत. घटना ठिकाणावरुन आरोपी रमन मुन्ना यादव, शंभु किस्टो यादव (सर्व रा.नथीला, नयाटोला जुराबगंज, ता.जि.काठियार , राज्य बिहार पोलीस ठाणे कोडा) हे घटना ठिकाणावरुन दुचाकीवरुन पळून गेले आहेत. आरोपींविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नंबर I २५१/२०२४ भादंवि.कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास राहुरी पोलिस ठाण्याचे सपोनिरीक्षक देवेंद्र शिंदे हे करत आहेत. गुन्ह्यात अटक आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांनी सोलापुर,औरंगाबाद,पुणे,अहमदनगर शहरामध्ये जबरी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments