Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमपत्नीने मुलाला फाशी देत स्वतः केली आत्महत्या

पत्नीने मुलाला फाशी देत स्वतः केली आत्महत्या

👉पतीसह चौघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर
: बीएसएफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने १० वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी जामखेड रोड वरील लष्करी वसाहतीत उघड़कीस आली. या प्रकरणी लष्करी जवान असलेल्या पतीसह सासू, सासरा व नणंद अशा चौघांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही अटक करण्यात आल्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू यांनी सांगितले.
राणी बाळकृष्ण तिकोने (वय ३०) व स्वराज बाळकृष्ण तिकोने (वय १०) असे दोघा मृतांची नावे आहेत. तर पती बाळकृष्ण तिकोने, सासरा रामदास तिकोने, सासू मंगल तिकोने, नणंद शुभांगी ठुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकोने कुटुंबीय मुळचे पारनेर तालुक्यातील वेसदरे येथील रहिवासी आहे.
ते. सध्या भिंगारच्या लष्करी हद्दीत जामखंड रोड वर दमानिया बंगल्या समोर राहत होते. पती बाळकृष्ण तिकोने हे सध्या बीएसएफ मध्ये कार्यरत आहेत. ते शुक्रवारी सुट्टीवर घरी आले. मात्र बराच वेळ घराचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आई, वडील व नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. ते आल्यावर त्यांनीही अनेक वेळा आवाज दिला मात्र दरवाजा न उघडल्याने बाळकृष्ण तिकोने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी पत्नी दरवाजा उघडत नसल्याचे सांगून पोलिसांना बरोबर नेले.
पोलिसांनी सायंकाळी ६ च्या सुमारासा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना राणी तिकोने व स्वराज या दोघांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्ह शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी मयत राणी तिकोने यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments