Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हासामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना निलेश लंकेंना पाहिले : माजीमंत्री पाटील.

सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना निलेश लंकेंना पाहिले : माजीमंत्री पाटील.

सोमराज बडे
Nagar Reporter (Video)
Online news Natwork
पाथर्डी:
सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडताना पाहिले आहे. आता तुमचे प्रश्न लोकसभेत मांडायचे असेल तर,सामान्य माणसात मिळून मिसळून समजून घेणारा माणूस खासदार असायला हवा,सामान्य माणसात मिसळण्याची कला ही निलेश लंके यांच्यामध्ये असून, ती कला दुसऱ्या कुणातही नाही, विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे नेते तथा माजीमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले.

पाथर्डी तालुक्यातील मोहटागडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तथा महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे दादासाहेब फाळके, शिवसेनेचे प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे आदिंसह काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.लोकसभेचे नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके म्हणाले, मला संधी दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल व त्यानंतरची निवडणुकीची धामधूम या काळात आपण गावागावांत जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, माझ्याकडे यंत्रणा उभी नाही परंतु जिवाभावाचे लोक आहेत. राज्याची परिस्तिती पाहिली तर वाटते की, लोकशाही टिकेल कि नाही.शासकीय यंत्रणा वापरून दबाव आणून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो आहे.सरपंच याना सुद्धा पॅकेज पोहोच करण्यात येईल असे म्हणतात. आणि गप करतात. प्रतिष्ठेसाठी दबाव आणला जातो आहे.सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की,हि निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेऊन काम सुरू करावे.असे म्हणून श्री लंके म्हणाले, या प्रारंभ झालेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप हा नगरच्या विशाल गणपतीचे दर्शन घेऊन युवानेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार आहोत.
यावेळी शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधला.पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे यावेळी बोलताना म्हणाले की महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार म्हणून निलेश लंके याना सर्वानुमते उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे .आम्ही सर्व जण ताकदीने लंके याना विजयी करण्यासाठी झोकून देऊन काम करणार आहोत.
प्रताप ढाकणे यांनी सांगितले की,कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागले पाहिजे.आपल्याला खासदार हा जनतेत जाणारा,जनतेसाठी राबणारा,गरिबांसाठी रात्रंदिवस जगणारा निलेश लंके सारखा खासदार पाहिजे.आ.प्राजक्त तनपुरे,यांच्यासह अन्य नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी भाषणे झाली.
या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातून आमदार निलेश लंके यांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप काका ढाकणे यांनी सकाळी दहा वाजता पाथर्डी ते मोहटादेवी गडापर्यंत मोटरसायकल रॅलीचे नियोजन केले होते.साडेदहा वाजता मोहटा देवीचे दर्शन घेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत देवीला नारळ वाढवत यात्रेचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ वाढवून मोहटादेवीच्या पायथ्याशी जाहीर सभा घेत तुतारी वाजवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments