Thursday, May 9, 2024
HomeVideo Newsतुर, सोयाबीन चोरणारी टोळी पकडली ; अ.नगर एलसीबीची कारवाई

तुर, सोयाबीन चोरणारी टोळी पकडली ; अ.नगर एलसीबीची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork (video)
अहमदनगर :
शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारे ७ जण पोलिसांनी पकडले. या कारवाईत ९ लाख २६ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल अहमदनगर एलसीबी टिम’ने जप्त केला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सफौ. भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ संदीप पवार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली ८४ हजार रुपये किमतीची पांढरी तुर ही रात्री दि.२७ डिसेंबरला रात्री १० ते दि.१८ डिसेंबर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा बाहेरुन लावून चोरुन नेली, या ऋषिकेश देविदास लगड ( रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून
बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९२/२०२३
भादवि कलम ३७९,३४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर एलसीबी टिम’ने तात्काळ जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचून थांबले असता माहितीप्रमाणे टाटा कंपनीची इंट्रा गाडी येतांना दिसली. गाडीच्या चालकास थांबवून गाडीमध्ये असलेल्या मालाची पाहणी केली‌. यावेळी पोलिसांना गाडीमध्ये तुर व सोयाबीन असल्याचे पथकास आढळून आले. त्यावेळी गाडीमधील इसमांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे गाडीमधील मालाबाबत विचारपुस करता त्यांनी गाडीमधील तुर व सोयाबीन असे चोरी करुन आणलेले असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी (वय २७, रा. पानमळा, जामगाव ता. पारनेर, जि. अहमदनगर), अमोल संतोष माळी (वय २४, रा. जामगाव ता. पारनेर), रोहीत सुनिल शेळके (वय १९, रा. लोणी हवेली, ता. पारनेर), आकाश अजिनाथ गोलवड (वय २५, रा. जामगाव ता. पारनेर), विकास विठ्ठल घावटे( वय २०, रा. जामगाव ता. पारनेर), संदीप उत्तम गोरे (वय ३२, रा. जामगाव ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार किरण संजय बर्डे (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे), साहील नामदेव माळी (रा. जामगाव ता. पारनेर) यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामध्ये ९६ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तुर, ३० हजार रुपये किमतीची ६ क्विंटल सोयाबीन व ८ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकूण ९ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९२/२०२३ भादवि कलम ३७९,३४२ प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments