Monday, May 20, 2024
Homeक्राईमकोपरगावात अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा ; २ ताब्यात : शिर्डी...

कोपरगावात अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा ; २ ताब्यात : शिर्डी डिवायएसपी टिमची कारवाई

२१ गॅस टाक्या, चार चाकी वाहनासह तब्बल ४ लाख ६६ हजार १४० रुपयाचा मुद्देमाल जप्त
Nagar Reporter
Online news Natwork
शिर्डी :
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर शिर्डी डिवायएसपी टिमने छापा टाकला. या छाप्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दरम्यान २१ गॅस टाक्या, चार चाकी वाहनासह तब्बल ४ लाख ६६ हजार १४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या टिमने केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३० डिसेंबर २०२३ ला शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नरजवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा चारचाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली. त्यांनी तहसील कार्यालय पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले. त्यावर त्या ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. या छाप्यात दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व १९ घरगुती गॅस टाक्या तसेच २ कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत. मनोज चंद्रकांत गिरमे (वय ४३, रा. खडकी रोड तालुका कोपरगाव), अल्ताफ बाबू शेख (वय ४८, रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण ४ लाख ६६ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३,७ आणि भारतीय दंड संहिता १८६० कलम २८५ अंतर्गत पोहेकाॅ इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोनि प्रदीप देशमुख, उपनि भरत दाते, पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे , तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments